डोंबिवली - कल्याण रेल्वे स्थानक परिसरात एका भिक्षुक महिलेच्या दीड महिन्याच्या बालिकेची चार लाख रुपयांत विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार जणांना ठाणे येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने अटक केली. मंगळवारी कल्याण पश्चिमेतील रामदेव हॉटेलजवळील सहजानंद चौकात ही कारवाई करण्यात आली.