जुन्या गाड्यांची खरेदी-विक्री मंदीच्या वाटेवर

कुर्ल्यातील जुन्या गाड्यांच्या खरेदी-विक्रीचा बाजार
कुर्ल्यातील जुन्या गाड्यांच्या खरेदी-विक्रीचा बाजार
Updated on

मुंबई : एकीकडे वाहनविक्रीचा व्यवसाय मंदीच्या मार्गावर रडतखडत धावत असतानाच कुर्ल्यातील जुन्या गाड्यांच्या बाजारातही खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना उतरती कळा लागली आहे. एकेकाळी जुनी वाहने आणि गाड्यांच्या सुट्या भागांसाठी प्रसिद्ध असलेला परिसर सध्या मंदीचे चटके सोसत आहे. १९७० च्या दशकात सुरू झालेल्या बाजारात आता फक्त २० टक्केच उलाढाल होत आहे. प्रदूषण नियंत्रणाच्या नियमामुळे कुर्ल्यातील बाजाराचे विकेंद्रीकरण झाले. त्यामुळे व्यापाऱ्यांसह कामगारांवरही स्थलांतरित होण्याची वेळ आली आहे.

लालबहादूर शास्त्री मार्ग आणि मिठी नदी यांच्यामध्ये कुर्ल्याच्या पश्‍चिमेला जुन्या गाड्यांचे मार्केट आहे. ४० वर्षांपासून सुरू असलेला बाजार आता कसाबसा तग धरून आहे. १९७० च्या दशकात सुरू झालेला बाजार आता प्रदूषण नियंत्रणासाठी आलेल्या कडक नियमांमुळे विभागला गेला आहे. पूर्वी जुनी निरुपयोगी झालेली वाहने बाजारातील व्यापारी विकत घ्यायचे. त्यानंतर त्या वाहनांचे सर्व भाग सुटे करण्यात यायचे आणि त्यांची वर्गवारी करून ते व्यापारी वा गॅरेजचालकांना विकले जायचे. अशा सुट्या भागांना बाजारात भरपूर मागणी असते. ते स्वस्तात उपलब्ध होतात. सुट्या भागांच्या खरेदीसाठी वाहनमालक बऱ्याचदा स्वतः येऊन इथून खरेदी करायचे; पण हल्ली तसे चित्र दिसत नाही. 

प्रदूषण नियंत्रण करण्याच्या उद्देशाने सरकारने आठ वर्षांपेक्षा जुन्या गाड्यांना शहरात प्रवेशबंदी केली आहे. त्याचा परिणाम वाहन खरेदी-विक्री व्यवसायावर दिसत आहे. काही व्यापाऱ्यांनी काळाची पावले ओळखून पनवेलजवळील कळंबोलीत नवीन बाजार सुरू केला आहे.

कुर्ल्यातील व्यापाऱ्यांकडे सरकारी आस्थापने वा बॅंकेने जप्त केलेल्या वाहनांचा लीलाव, सीएनजी किट असलेली जुनी वाहने आणि क्वचितप्रसंगी अपघात झालेल्या वाहनांची खरेदी असे पर्याय उरले आहेत. 

वाहनांची मागणी घटली 
सरकारच्या विविध विभागांत वापरलेल्या वाहनांची बोली लावून इथले व्यापारी खरेदी करायचे. त्या वाहनांबद्दल ग्राहकांना अधिक विश्‍वास असतो. त्यांची योग्य दुरुस्ती व रंगरंगोटी करून कागदपत्रांची पूर्तता केली जायची. अशी वाहने घेऊन बरेच जण आपले चारचाकीचे स्वप्न पूर्ण करायचे; पण आता अशा ग्राहकांचे प्रमाणही घटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.