Salman Khan Death Threat: जमशेदपूरमध्ये थरार... सलमान खानला कोण पाठवत होतं धमकीचे मेसेज? भाजीविक्रेता मुंबई पोलिसांच्या कचाट्यात

Salman Khan Death Threat One Arrested From Jharkhand: मुंबई पोलिसांनी जमशेदपूरच्या स्थानिक पोलिसांच्या मदतीने या प्रकरणाचा तपास केला आणि बुधवारी मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली.
Salman Khan
Salman Khan Esakal
Updated on

अभिनेता सलमान खानला धमकीचे मेसेज पाठवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी झारखंडमधील जमशेदपूर येथून एका आरोपीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी जमशेदपूर येथील भाजीविक्रेता आहे.

गेल्या आठवड्यात मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या व्हॉट्सॲप हेल्पलाइनवर सलमान खानला 5 कोटी रुपयांची मागणी करणारा धमकीचा मेसेज आला होता, त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.

मुंबई पोलिसांनी जमशेदपूरच्या स्थानिक पोलिसांच्या मदतीने या प्रकरणाचा तपास केला आणि बुधवारी मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.