Security Measures for Salman Khan: बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर मुंबई पोलीसांना सलमानची चिंता; भाईजानला पाळाव्या लागणार 'या' सूचना

Mumbai Police Salman Khan: या सर्व घडामोडी घडत असताना मुंबई पोलिसांनी अभिनेता सलमान खानला त्याच्या सुरक्षतेसाठी काही सूचना केल्या आहेत. त्या सूचना आता सलमान खानला पाळाव्या लागणार आहेत.
Mumbai Police provide safety instructions to actor Salman Khan after Baba Siddiqui's murder.
Mumbai Police briefing Salman Khan on safety measures following recent eventsEsakal
Updated on

Security Measures for Salman Khan: महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली आहे, तर तीन आरोपी अद्याप फरार आहेत. असे असले तरी पोलिसांना आता अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेची चिंता लागली आहे. कारण सलमान खान हा बाबा सिद्दीकी यांच्या जवळच्या लोकांपैकी एक होता, त्यामुळे त्याच्यावरही हल्ला होणाची शक्यत आहे. तर दुसरीकडे गेल्या काही महिन्यांपासून बिश्नोई टोळी सातत्याने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देते.

दरम्यान या सर्व घडामोडी घडत असताना मुंबई पोलिसांनी अभिनेता सलमान खानला त्याच्या सुरक्षतेसाठी काही सूचना केल्या आहेत. त्या सूचना आता सलमान खानला पाळाव्या लागणार आहेत.

बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी सलमानला गर्दीच्या ठिकाणी जाण्यावर बंदी घातली आहे. यापूर्वी लॉरेन्स बिश्नोई टोळीने या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारताच पोलिसांनी सलमानला कोणालाही भेटू नका असे सांगितले होते.

सलमानच्या कुटुंबीयांनी त्याच्या सर्व जवळच्या मित्र-मैत्रिणींना सलमानला भेटायला न येण्याचे आवाहन केले आहे. सलमानच्या सुरक्षेतेसाठी कुटुंबीयांनी हे आवाहन केले आहे. यासोबतच सलमानने त्याच्या सर्व वैयक्तिक भेटीगाठी आणि कार्यक्रमही रद्द केले आहेत.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बाबा सिद्दिकीवर गोळीबार करण्यापूर्वी मिरचीचा स्प्रे आणला होता. त्याचा वापर करण्याची योजना आखली होती. मात्र, शिवाने त्यांच्यावर थेट गोळीबार सुरू केला. बाबा सिद्दीकींच्या सुरक्षा रक्षकांनी धरमराज आणि गुरमिलला पकडण्यात यश मिळवले, तर शिवा पळून जाण्यात यशस्वी झाला.

रविवारी पुण्यातील शुभम लोणकर नावाच्या तरुणाने सोशल मीडियावर पोस्ट टाकून लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या वतीने हत्येची जबाबदारी स्वीकारली. शुभम ) आणि त्याचा भाऊ प्रवीण यांनी शिवकुमार आणि धर्मराज कश्यप यांना बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे कंत्राट दिले होते.

पोलिसांनी रविवारी सायंकाळी प्रवीणला अटक केली असून त्याच्या भावाचा शोध सुरू आहे. तथापि, पोलिसांनी अद्याप या हत्येमध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सहभाग असल्याची पुष्टी केलेली नाही आणि या दाव्यांचा तपास सुरू आहे.

Mumbai Police provide safety instructions to actor Salman Khan after Baba Siddiqui's murder.
Baba Siddiqui Case: बाबा सिद्दीकींचा मुलगा झीशानसुद्धा टार्गेटवर; मुंबई पोलिसांकडे महत्त्वाचे इनपुट्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.