मुंबई : वारंवार आक्षेपार्ह विधान करणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे यांना तुरुंगात कधी टाकणार? टाकणार नसेल तर आम्हाला त्यांचा बंदोबस्त करावा लागेल, असा इशारा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला दिला आहे. (Sambhaji Bhide Congress Vijay Wadettivar warning to Maha govt over controversy)
वडेट्टीवार म्हणाले, "जे शब्द आम्ही उच्चारू शकत नाहीत. अशा गलिच्छ शब्दांत या नालायक माणसानं वक्तव्य केलं आहे. म्हणून त्याला असेल तिथून उचलून कोठडीत घालावं, ही सरकारकडून अपेक्षा आहे.
बहुजनांचा अपमान, राष्ट्रध्वजाचा अपमान, राष्ट्रपित्याचा अपमान आणि त्याच्याही पलिकडे जाऊन जिथं स्वतः या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साईबाबांच्या चरणी नतमस्तक झाले त्या साईबाबांचा अपमान, करोडो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या करोडो लोकांचा अपमान या पापभिरु नालायक माणसानं केलेला आहे.
यावरुनच या माणसाची लायकी आणि जागा कोडडीत आहे. या माणसावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे" असंही त्यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)
या देशातील जनता हे कदापि सहन करणार नाही. स्वतः उपमुख्यंत्र्यांनी राष्ट्रपित्या अपमान सहन करु शकत नाही अशी भूमिका मांडली होती. त्यामुळं आता भिडेंना कधी तुरुंगात टाकणार हा प्रश्न आहे. अन्यथा आम्हाला याचा बंदोबस्त करावा लागेल, यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही, असा इशाराही वडेट्टीवार यांनी सरकारला दिला आहे. (Marathi Tajya Batmya)
टोपणनाव लावून भिडे मराठी मुलांना भुरळ घालत आहेत. ते विष ओकण्याचं काम यासाठी करतात की जातीय तेढ निर्माण व्हावं. मतांचं केंद्रीकरण व्हावं आणि सत्ताधारी भाजपला फायदा व्हावा हा त्यांचा उद्देश असल्याचं स्पष्टपणे दिसतं आहे.
हिंदू-मुस्लीम तेढ निर्माण करणं, काँग्रेसला डिवचणं, राष्ट्रपुरुष-महात्मांचा अपमान करणं, आरएसएसच्या लोकांचं गुणगाण करणं हे काम ते सातत्यानं करत आहेत. त्यामुळं कोणी कितीही नाकारलं तरी हे भाजपला पोषक आहे. हे आता महाराष्ट्रातील जनतेला कळत आहे, त्यामुळं त्यांचा बोलविता धनी हा सत्तापक्ष आहे हे सांगण्याची गरज नाही, असंही वडेट्टीवार यांनी म्हटलंय.
भिडेंच्या विधानाची फॉरेन्सिक चाचणी करण्याची गरज नाही. त्यांनी जाहीरपणे केलेली ही विधानं आहेत. त्यावर माध्यमांमधून छापून देखील आलेलं आहे. त्यामुळं भिडेंवर कारवाई करण्यात वेळकाढूपणा करण्याचं काम सरकारकडून केलं जात आहे, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.