Mumbai News : संभाजी ब्रिगेडचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

कंत्राट पद्धतीने भरती प्रक्रियेचा विरोध करण्यासाठी मुंडन आंदोलन
Sambhaji Brigade Protest in front of collector office contract recruirment process mumbai
Sambhaji Brigade Protest in front of collector office contract recruirment process mumbaiesakal
Updated on

मुंबई : राज्य सरकारमार्फत विविध विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यासंदर्भात अध्यादेशाचा संभाजी ब्रिगेडने निषेध केला आहे. या अध्यादेशाच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत, मंगळवार दिनांक ११ एप्रिल रोजी मुंबई, बांद्रा जिल्हाधिकारी कार्यालय येथे संभाजी ब्रिगेडने मुंडन आंदोलन केले.

तसेच, येणाऱ्या काळात राज्यात संभाजी ब्रिगेड सरकारचा तुघलकी डाव हाणून पाडण्यासाठी प्रचंड मोठे आंदोलने करत महामोर्चे काढण्यात येतील, असा इशाराही संभाजी ब्रिगेडचे मुंबई अध्यक्ष सुहास राणे यांनी यावेळी राज्य सरकारला दिला आहे.

माध्यमांशी बोलताना सुहास राणे म्हणाले की, अगोदरच भ्रष्टाचार, बेरोजगारी,शेतकऱ्यांच्या- युवकांच्या आत्महत्त्या, स्त्रियांवरील वाढलेले अत्याचार, प्रचंड महागाई, शेतीमालाचे मुद्दाम पाडलेले भाव , प्रशासकीय अनागोंदी, राजकीय पक्षांची कमालीची उदासीनता आणि प्रचार प्रसार माध्यमांची साळसूद भूमिका यामुळे त्रस्त झालेल्या महाराष्ट्रीयन जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा घृणास्पद प्रकार भाजपामय शिंदे सरकारने केला आहे.

या गलथान व्यवस्थेच्या विरोधात संभाजी ब्रिगेड अत्यंत संघर्षशील स्वरूपात नव्याने लढाईच्या तयारीत आहे. सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून संभाजी ब्रिगेडचा लढा अखंड सुरू राहील, असेही राणे यावेळी म्हणाले. राज्य सरकारचा निषेध करत संभाजी ब्रिगेड मुंबईच्यावतीने उत्तर मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष सागर देवडकर आणि कार्यालय सचिव प्रविण पटेल यांनी आपले मुंडन करून जाहीर निषेध केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.