Sambhaji Raje on Badlapur: "...तर शासनानं अन् बेगडी मानवतावाद्यांनी लोकांना दोष देऊ नये"; संभाजीराजेंची संतप्त प्रतिक्रिया

बदलापूरला शाळेत घडलेल्या चिमुरड्यांवरील लैंगिक शोषणाच्या घटनेनंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.
Sambhaji Raje Chhatrapati
Sambhaji Raje Chhatrapati sakal
Updated on

मुंबई : बदलापूरला शाळेत घडलेल्या चिमुरड्यांवरील लैंगिक शोषणाच्या घटनेनंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. जनमांनसातून अनेक संपातजनक प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. माजी खासदार आणि स्वराज पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी देखील यावर इशारा वजा प्रतिक्रिया दिली आहे.

संभाजीराजे यांनी ट्विट करुन आपल्या मनातील संताप व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिलं की, ना कायद्याचा धाक.... ना समाजाचा चाप! कोलकाता येथील घटनेतील सर्व आरोपी अद्याप पकडले गेलेले नाहीत. उरण येथील घटना ताजी असतानाच नुकतीच छत्रपती संभाजीगर जिल्ह्यात दहावीत ९६ टक्के मार्क मिळवलेल्या एका १६ वर्षांच्या मुलीनं वकृत मेकॅनिक मुलाच्या अघोरी त्रासाला कंटाळून आत्महत्या केली.

Sambhaji Raje Chhatrapati
Pune School Crime: महाराष्ट्रात काय सुरुए! बदलापूरनंतर आता पुण्यातील शाळेत विद्यार्थीनीवर अत्याचाराचा प्रयत्न?; स्वातंत्र्यदिनीच घडली घटना

आता बदलापूर येथील शाळेत चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याचे उघडकीस येत आहे. संपूर्ण देशभरात कोमतंच सरकार महिलांना सुरक्षिततेची हमी देण्यास कमी पडत आहे. विकृती वाढीस लागली आहे. आरोपींना वेळीच पकडले जात नाही. पकडले तरी कठोर शिक्षा होत नाही. कित्येक तर निर्दोष सुटून जातात. दैशात कायद्याचा धाक राहिलेला नाही. अशा गैरप्रकारांना रोखण्यासाठी लोकांनीच कठोर मिका घेतली, तर शासनानं आणि समाजातील बेगडी मानवतावाद्यांनी लोकांना दोष देऊ नये, असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.

Sambhaji Raje Chhatrapati
Badlapur School Crime: "आरोपीला आमच्यासमोर आणा"; मध्यस्थीसाठी आलेल्या महाजनांवर भडकल्या महिला, बदलापूरमध्ये आंदोलन सुरूच

बदलापुरात नेमंक काय घडलं?

बदलापुरातील एका नामांकीत शाळेमध्ये तीन ते चार वर्षांच्या दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या शाळेतील एका सफाई कर्मचाऱ्यानं हे अमानुष कृत्य केलं आहे. याप्रकरणी पीडित मुलीनं आईकडं आपल्याला त्रास होत असल्याचं सांगितल्यानंतर तिला रुग्णालयात नेऊन तपासणी केल्यानंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. जेव्हा हे प्रकरण माध्यमांमध्ये आलं तेव्हा बदलापूरमधील नागरिकांमध्ये संपाताची लाट उसळळी. मंगळवारी त्यांनी बदलापूर बंदची हाक दिली. आंदोलकांनी बदलापूर रेल्वे स्थानकवरच ठिय्या मांडला. यामुळं कर्जतहून मुंबईकडं जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या थांबवण्यात आल्या आहेत.

पोलीस नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत, पण आंदोलक नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. जोपर्यंत आरोपीला फाशी देत नाहीत, तसंच अजून किती मुलींवर असे प्रसंग ओढवले असतील ते पोलीस शोधून काढत नाहीत, तोपर्यंत इथून हटणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.