क्लिनचीट मिळाल्यानंतर समीर वानखेडेंची प्रतिक्रिया; म्हणाले 'सत्यमेव जयते'

Sameer Wankhede
Sameer WankhedeSakal
Updated on

मुंबई - आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात चर्चेत आलेले समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी काही गंभीर आरोप केले होते. वानखेडे जन्माने मुस्लीम आहेत आणि त्यांनी बोगस जात प्रमाणपत्र सादर करून मागासवर्गीय कोट्यातून सरकारी नोकरी मिळवल्याचा दावाही केला होता. या प्रकरणात आता वानखेडेंना दिलासा मिळाला आहे. यावर आता समीर वानखेडे यांची प्रतिक्रिया आली आहे. (sameer wankhede news in Marathi)

Sameer Wankhede
मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याच्या नाराजीवर पंकजा मुंडे म्हणाल्या, कार्यकर्ते..

समीर वानखेडे म्हणाले की, सत्यमेव जयते. जातपडताळणी समितीचे आभार. जे सत्य होतं, ते बाहेर आलेलं आहे. पहिल्यांदाच एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याच्या दिवंगत आई, बहिण, वडील आणि बायकोवर आरोप झाले. न्यायपालिकेवर पूर्ण विश्वास आहे. पुढील लढा पण देऊ. सत्याचा विजय तिथंही होईल, असंही वानखेडे यांनी म्हटलं.

Sameer Wankhede
मंत्रिपदाच्या शपथेनंतर संजय राठोडांचे मतदारसंघात जोरदार शक्तिप्रदर्शन

या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत असलेल्या जात प्रमाणपत्र पडताळणी समिती करत होती. या समितीचा निकाल समीर वानखेडेंच्या बाजूने लागला आहे. समीर वानखेडे जन्माने मुस्लीम नाहीत. वानखेडेंच्या वडिलांनी हिंदू धर्माचा त्याग करून मुस्लीम धर्माचा स्विकार केल्याचं सिद्ध होत नाही, असं समितीने म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.