'माझं नाव दाऊद नसून ज्ञानदेव', समीर वानखेडेंच्या वडिलांचा खुलासा

'जन्मापासून माझं नाव ज्ञानदेव कचरुची वानखेडे आहे'
'माझं नाव दाऊद नसून ज्ञानदेव', समीर वानखेडेंच्या वडिलांचा खुलासा
Updated on

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (ncp) आणि प्रवक्ते नवाब मलिक (nawab malik) यांच्याकडून एनसीबीचे झोनल संचालक समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्यावर व्यक्तीगत स्वरुपाचे हल्ले सुरु आहेत. नवाब मलिक यांनी टि्वटरवर एक जन्म दाखला शेअर करुन समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद असल्याचा दावा केला होता.

आता समीर वानखेडे यांच्या वडिलांनी स्वत: या बद्दल खुलासा केला आहे. "माझं नाव दाऊद नसून ज्ञानदेव आहे आणि जन्मापासून ज्ञानदेव वानखेडे आहे" असं समीर वानखेडे यांच्या वडिलांनी सांगितले. "माझ नाव दाऊद कधीही नव्हतं. जन्मापासून माझं नाव ज्ञानदेव कचरुची वानखेडे आहे. शाळा, कॉलेज, एलएलबीला प्रवेश घेण्यापासून निवृत्त होईपर्यंत माझा नाव ज्ञानदेव वानखेडे आहे. कोणी तरी हा खोडकरपणा केला आहे" असे ज्ञानदेव वानखेडे यांनी सांगितले.आज नवाब मलिक यांनी ट्विटरवर एक क्रॉप केलेला फोटो शेअर केला आहे. याला पहचान कौन असा कॅप्शन दिलं आहे.

'माझं नाव दाऊद नसून ज्ञानदेव', समीर वानखेडेंच्या वडिलांचा खुलासा
'आर्यननेच मला शाहरुख-गौरीला फोन करायला सांगितलं'; गोसावीचा खुलासा

हा फोटो एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचा असल्याचं म्हटलं जात आहे. समीर यांची पत्नी क्रांती रेडकर हिने सुद्धा लग्नाचे फोटो पोस्ट करुन आपली बाजू मांडली. 'मी आणि माझे पती समीर हे जन्माने हिंदू आहोत. आम्ही कधीच धर्मपरिवर्तन केलं नाही', असं तिने ट्विटद्वारे स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.