Samir Khan: नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचं निधन; काही दिवसांपूर्वी झाला होता अपघात

काही दिवसांपूर्वीच त्यांचा अपघात झाला होता. याप्रकरणी त्यांच्यावर उपचार सुरु होते.
Samir Khan
Samir Khan
Updated on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचं निधन झाल्याचं वृत्त आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचा अपघात झाला होता. याप्रकरणी त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारांपूर्वीच तासाभरापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे.

Samir Khan
Nawab Malik Bail: नवाब मलिक यांना 'सुप्रीम' दिलासा! वैद्यकीय जामीन कायम, ED ची हरकत नाही

सप्टेंबर महिन्यात समीर खान यांचा कुर्ल्यात कार अपघात झाला होता. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. नवाब मलिक यांची मुलगी आणि जावई रुग्णालयातून नियमित चेकअपनंतर घरी परतत असताना त्यांचा अपघात झाला होता. जेव्हा ते कारमध्ये बसत होते तेव्हा कार चालकानं चुकून एक्सलेटर दाबला त्यानंतर कार एका भिंतीला जाऊन धडकली. या अपघातात समीर खान यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये उपचार सुरु होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.