Samsung in Mumbai: सॅमसंगने मुंबईत सुरु केले भारतातील पहिले ऑनलाईन टू ऑफलाईन लाईफस्टाईल स्टोअर, घेता येणार AIचा अनुभव

सॅमसंग कंपनीतर्फे आज मुंबईतल्या बीकेसी येथे जिओ प्लाझा मॉलमध्ये ऑनलाइन टू ऑफलाइन लाईफस्टाईल स्टोअरचे उद्घाटन करण्यात आले आहे. हे भारतातील पहिले स्टोर आहे.
Samsung in Mumbai: सॅमसंगने मुंबईत सुरु केले भारतातील पहिले ऑनलाईन टू ऑफलाईन लाईफस्टाईल स्टोअर, घेता येणार AIचा अनुभव
Updated on

Sumsung Online to Offline Store in Mumbai: सॅमसंग कंपनीतर्फे आज मुंबईतल्या बीकेसी येथे जिओ प्लाझा मॉल मध्ये ऑनलाइन टू ऑफलाइन लाईफस्टाईल स्टोअर चे उद्घाटन करण्यात आले. हे स्टोअर या प्रकारचे भारतातील पहिले स्टोअर आहे. सॅमसंगच्या ए आय इकोसिस्टीम चा फायदा घेऊन सॅमसंगचे सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या आजवर भारतात प्रदर्शित करण्यात आल्या नव्हत्या त्या सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवत आहे.

आज सायंकाळी साडेपाच वाजल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांसाठी हे स्टोर खुले होणार आहे. या ठिकाणी आठ विविध प्रकारचे लाईफस्टाईल झोन हे नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. ज्यामध्ये हॉबी रूम, होम ऑफिस, होम अटायर, होम कॅफे, कनेक्टेड किचन, प्रायव्हेट सिनेमा, इंटेलिजंट क्लोझेट अशा प्रकारचे झोन नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत

या स्टोरमध्ये ग्राहकांसाठी विविध कष्टमयझेशनचे पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. स्टोरमध्ये यायच्या आधी सुद्धा ग्राहक ऑनलाईन ऑर्डर करून ती गोष्ट स्टोर मधून विकत घेऊ शकतात. यामुळे ऑफलाइन आणि ऑनलाईन या दोन जगांना एकत्र आणण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. (Latest Marathi News)

मुंबई व्यतिरिक्त भारतातील दिल्ली आणि बेंगलोर सारख्या शहरांमध्ये देखील सॅमसंगचे स्टोअर आहे. मात्र अशा प्रकारचा प्रयोग हा मुंबईत पहिल्यांदा केला गेला आहे. याचबरोबर आता इतर शहरांमध्येही सॅमसंग अशा प्रकारे स्टोअर्स उघडणार आहे.

Samsung in Mumbai: सॅमसंगने मुंबईत सुरु केले भारतातील पहिले ऑनलाईन टू ऑफलाईन लाईफस्टाईल स्टोअर, घेता येणार AIचा अनुभव
ICC 2023 Men's Test Team: आयसीसीच्या सर्वोत्तम कसोटी संघात रोहित, विराट नव्हे 'या' 2 भारतीय खेळाडूंना संधी

यावेळी सॅमसंगचे साउथ वेस्ट एशिया प्रमुख जी.बी.पार्क यांच्या हस्ते या स्टोरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी सांगितले की, आम्ही या आधी कधीही न पाहिलेला अनुभव लोकांपुढे मांडत आहोत. आठ झोन मध्ये आम्ही आमचे सर्व ए.आय.चे अनुभव समाविष्ट केले आहेत. यामुळे ग्राहकांना याचा आनंद घेता येणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा खूप चांगला अनुभव यामध्ये नागरिकांना म्हणजेच ग्राहकांना मिळणार आहे. (Latest Marathi News)

Samsung in Mumbai: सॅमसंगने मुंबईत सुरु केले भारतातील पहिले ऑनलाईन टू ऑफलाईन लाईफस्टाईल स्टोअर, घेता येणार AIचा अनुभव
Ayodhya Crowd News: अयोध्येला जाताय तर थांबा! गर्दीमुळे योगी प्रशासनाचा मोठा निर्णय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.