Sandeep Deshpande : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर काल सकाळी अज्ञातांनी हल्ला केला. या हल्ला प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या आरोपींना ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
काल सकाळी शिवाजी पार्क इथं संदीप देशपांडे यांच्यावर अज्ञात आरोपींनी हल्ला केला होता. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले. या आरोपींनी प्राथमिकरित्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे, पण पोलिसांचा तपास सुरू आहे.
आरोपी कोण आहेत?
मनसे नेता संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला अशोक खरात हा एक सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध तब्बल १३ गुन्हे नोंद आहेत. गवळी गँग मधील एकाची हत्या केल्याच्या गुन्ह्यात देखील खरात आरोपी आहे. खरात विरोधात MCOCA अंतर्गत देखील कारवाई करण्यात आली आहे. भांडुप परिसरात खरात राजकारणात सक्रिय असून दोन वेळा लोक जनशक्ती नावाच्या पार्टीकडून पलिकेलची निवडणूक त्याने लढवली आहे.
परिसरात दहशत निर्माण करून आपला दबदबा वाढवणं हा या हल्यामागचा उद्देश असल्याचं पोलीस सांगत असेल तरी त्याला राजकीय पार्श्वभूमी असण्याची देखील दाट शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगार सेनेचे हे खरात उपाध्यक्ष आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.