"चायनीज हॉटेल्सचा चीनशी काय संबंध ? बेवकूफ शिवसैनिकांना हे कधी कळणार?", संजय निरुपम यांनी उडवली सेनेची खिल्ली

"चायनीज हॉटेल्सचा चीनशी काय संबंध ? बेवकूफ शिवसैनिकांना हे कधी कळणार?", संजय निरुपम यांनी उडवली सेनेची खिल्ली
Updated on

मुंबई, ता. 19 : वांद्रे येथील कराची स्वीट्स या दुकानाचे नाव बदलण्याच्या शिवसैनिकांच्या मागणीला सेना नेते संजय राऊत यांनीच फटकारल्याने कहानी मे ट्विस्ट आला आहे. काँग्रेस नेते संजय निरुपम यांनीही या वादात उडी घेत शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. 

सिंधी व्यावसायिकाचे कराची स्वीट्स हे दुकान आहे. कराची हे पाकिस्तानातील शहर असून त्या देशातील अतिरेकी भारतीय जवानांवर हल्ले करीत असल्याने त्या देशाची आठवणही भारतात नको, अशी भूमिका घेत नितीन नांदगावकर या शिवसैनिकाने या दुकानदाराला दुकानाचे नाव बदलण्याचा इशारा दिला होता. मात्र नंतर संजय राऊत यांनीच ट्विट करून ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नसल्याचे स्पष्ट केले. 

कोरोना काळात रुग्णांकडून जादा बिल घेणाऱ्या रुग्णालयांना वठणीवर आणणारे शिवसैनिक म्हणून नांदगावकर चर्चेत आले होते. असे संवेदनशील म्हणवले जाणाऱ्या या कार्यकर्त्याने आज अशी असंवेदनशील भूमिका का घेतली, अशी चर्चा आज नागरिकांमध्ये होती. यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सांताक्रूझच्या चंदू हलवाई कराचीवाला या दुकानाचे नाव बदला, अन्यथा खळ्ळ खट्याक करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर या दुकानाचे नाव पंजाबी चंदू हलवाई असे बदलण्यात आले होते, त्यावेळी देखील मनसेवर अशीच टीका करण्यात आली होती. 

फाळणीदरम्यान काहीही दोष नसताना आपली जन्मभूमी, घरदार, संपत्ती सोडून भारतात पळून यावे लागलेल्यांनी तेवढीच आठवण जपण्यासाठी दुकानाला कराचीचे नाव दिले तर बिघडले काय. असे केल्याने कोणी पाकधार्जिणा तर नक्कीच होत नाही. काबुलीवाला चित्रपटातील ऐ मेरे प्यारे वतन या गाण्यावर माना डोलवायच्या आणि कराचीतून भारतात आलेल्या सिंधी बांधवांना धमक्या द्यायच्या हे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया यानिमित्ताने व्यक्त होत होती. 

जसा गल्लोगल्ली असलेल्या चायनीज हॉटेलांचा चीनशी काहीही संबंध नाही, तसाच या कराची दुकानाचा पाकिस्तानशी काहीही संबंध नाही. पण 'बेवकूफ शिवसैनिकांना हे कधी कळणार', असे ट्वीट करून काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली.

sanjay nirupam pulls leg of shivsena over changing name of karachi sweet store of bandra

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.