बंगाल निवडणुकानंतर सुरू असलेल्या हिंसाचाराच्या घटनांवर केलं भाष्य
महाराष्ट्रातून पूनावालांना कोणीही धमकी देणं शक्य नाही, ती महाराष्ट्राची संस्कृती नाही!
सीरमच्या पूनावालांचे संरक्षण करणं ही सर्वांचीच जबाबदारी आहे!
मुंबई: देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल रविवारी लागले. या पाचपैकी सर्वात लक्षवेधी ठरलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकांमध्ये ममता बॅनर्जींचा (Mamta Banerjee) पक्ष तृणमूल काँग्रेस (TMC) बहुमताने जिंकला. तर भाजपला ९०च्या आसपास जागा मिळाल्या. यात विशेष बाब म्हणजे पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या ममता बॅनर्जी नंदीग्रामच्या मतदारसंघातून पराभूत झाल्या. त्यानंतर तेथे राजकीय हिंसाचार सुरू असल्याचं चित्र आहे. या मुद्द्यावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केलं. "निवडणुकांचा माहोल संपलेला आहे. त्यामुळे आता आरोप-प्रत्यारोप थांबवा. देशावर कोरोनाचं संकट आहे. अशा परिस्थितीत एकमेकांना धमक्या देणं थांबवा आणि कोरोनाविरूद्ध एकत्र येऊन लढा", असा सल्ला त्यांनी सर्वच पक्षांना दिला. (Sanjay Raut Advice Political Parties to Stop Blaming Each Other and Fight Against Corona Unitedly)
सीरमचे अदर पुनावाला (Adar Poonawalla) यांनी काही दिवसांपूर्वी धक्कादायक खुलासा केला होता. 'देशातील काही राजकीय मंडळी आणि बड्या हस्ती मला फोन करून धमक्या देत आहेत. मी नाव घेतलं तर माझं शीर कापलं जाईल', असं त्यांनी द टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. त्यावर राऊत म्हणाले, "पूनावाल स्वत:च म्हणालेत की त्यांच्या विधानाचा विपर्यास करण्याक आला आहे. मला खात्री आहे की महाराष्ट्रातील कोणताही राजकीय नेता किंवा पक्ष त्यांना अशा प्रकारची धमकी देणार नाही. आम्ही आधीपासूनच सांगतोय की अशी लस महाराष्ट्रात तयार होतेय आणि देशाला व देशाबाहेर दिली जातेय याचा आम्हाला गर्व आहे."
"लसीकरणाबाबत जर कोणी खरंच असं करत असेल आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होताना दिसत असेल तर त्या प्रकरणाचा नक्कीच तपास केला जाईल. पूनावालांची सुरक्षा करणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे. ते जे काम करत आहेत ते देशाच्या जनतेसाठी आणि राष्ट्रासाठी करत आहेत. त्यामुळे अशा व्यक्तीची सुरक्षा करणं हे आपलं कर्तव्य आहे", असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.