मुंबई : शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ED कडून नोटीस आली आहे. यानंतर महाराष्ट्रातील राजकारण ऐन थंडीत गरामगरमीचं झालं आहे. राजकीय फायद्यासाठी ED, CBI, इन्कमटॅक्स यासारख्या संस्थांचा वापर होत असल्याचं शिवसेनेने अनेकदा बोलून दाखवलंय. दरम्यान वर्षा राऊत यांना ED नोटीस आल्यानंतर संजय राऊत प्रचंड आक्रमक झालेत. यानंतर आज संजय राऊत यांनी आता निर्वाणीचा इशारा दिलाय. आता पुरे झालं, आता हे सिद्ध करा किंवा कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयारी ठेवा असं संजय राऊत म्हणालेत. राऊतांनी याबाबतचं एक ट्विट केलंय.
Suddenly many lotus are glooming with godi media after my family receiving ED notice made public. People are aware how 'caged parrots' are being released for political vendetta. My family's name is mischievously being linked to PMC and HDIL scam. I challenge them to prove it or face legal action. Enough is enough. समझनेवाले को इशारा काफी है.
महत्त्वाची बातमी : विकतचे दुखणे कशासाठी? कार भाड्याने घेण्याचा मुंबईतही ट्रेंड वाढतोय
संजय राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, "माझ्या परिवाराला ED नोटीस आल्याचं सार्वजनिक झाल्यानंतर अचानक काही गोदी मीडियामधील कमळं फुलू लागलीत. मात्र राजकीय सूड उगवण्यासाठी पिंजऱ्यातील पोपटांना कशा प्रकारे सोडलं जातं हे सर्वांना ठाऊक आहे. पीएमसी आणि एचडीआयएल घोटाळ्याशी माझ्या कुटुंबाचे नाव खोडकरपणे जोडले जात आहे. हे सिद्ध करा किंवा कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार राहा. आता पुरे झालं! समझनेवाले को इशारा काफी है."
दरम्यान, वर्षा राऊत यांना काल ED कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स मिळाला होता. यानंतर आम्ही ED कडे चौकशीसाठी हजर राहण्याआधी अधिकचा वेळ मागितला आहे, असं संजय राऊतांनी स्वतः सांगितलं होतं. यानंतर आता पाच जानेवारीला वर्षा राऊत यांना चौकशीसाठी पाचारण करण्यात आलं आहे असं समजतंय.
sanjay raut aggressive tweet ED notice PMC HDIL scam varsha raut politics in maharashtra
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.