Sanjay Raut : बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेवर हातोड्याचे ‘वर्षा’ हून आदेश - संजय राऊत

खासदार संजय राऊत यांचा आरोप
sanjay raut allegation order given from Varsha ill-famed Shiv Sena chief Balasaheb Thackeray Bandra mumbai
sanjay raut allegation order given from Varsha ill-famed Shiv Sena chief Balasaheb Thackeray Bandra mumbaiesakal
Updated on

मुंबई : मुंबईतील वांद्रे पूर्व येथील शिवसेना शाखेतील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेवर हातोडा मारण्याचे आदेश ‘वर्षा’हून देण्यात आले होते, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.

राऊत यांनी या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे यांचे थेट नाव घेतले आहे. बाळासाहेब ठाकरे यांना सरकारने राष्ट्रपुरुषांचा दर्जा दिला आहे. त्यामुळे आता कायद्यानुसार महापालिका अभियंत्यावर कारवाई करणार का, असा सवाल करत बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही, असे राऊत यांनी निक्षून सांगितले.

sanjay raut allegation order given from Varsha ill-famed Shiv Sena chief Balasaheb Thackeray Bandra mumbai
Sanjay Raut यांनी Devendra Fadnavis यांवर डागली तोफ । Mumbai | Eknath Shinde

वांद्रे पूर्व येथील ठाकरे गटाच्या शाखेवर मुंबई महापालिकेने सोमवारी (ता.२६) कारवाई केली. या कारवाईवेळी बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेवर हातोडा मारल्याचा ठाकरे गटाचा दावा आहे. यावरून खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली.

sanjay raut allegation order given from Varsha ill-famed Shiv Sena chief Balasaheb Thackeray Bandra mumbai
Sanjay Raut : 'पाटणचं नाव महाराष्ट्रात बदनाम झालंय, गद्दारीमुळं त्यांना तोंडवर करून चालायची लाज वाटतेय'

प्रतिमांचा अवमान झालेला ना

वांद्रे पूर्व येथील राजकीय पक्षाशी संबंधित बांधकामावर महापालिकेने केलेली निष्कासनाची कारवाई नियमानुसार केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचा अवमान झालेला नाही,

असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले. कारवाई करण्यापूर्वी महापालिका प्रशासनानेच कार्यालयातील प्रतिमा, पुतळे तसेच इतरही साहित्य हलविण्याची विनंती केली होती. त्याकरिता संबंधित बांधकामधारकांना अडीच तासांचा वेळदेखील देण्यात आला होता, असे स्पष्टीकरण पालिकेने दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.