गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत विसंवाद असल्याच्या चर्चा
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात कोणताही विसंवाद नाही. शरद पवार नाराज आहेत अशी जी चर्चा रंगल्याचे समजले आहे, त्या चर्चेला काहीही अर्थ नाही, असं स्पष्टीकरण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले. गेले काही दिवस महाविकास आघाडीत वाद असल्याची चर्चा रंगली होती. तशातच, काल संजय राऊत यांनी आधी मुख्यमंत्र्यांशी दीड तास आणि नंतर शरद पवार यांच्याशी त्यांच्या निवासस्थानी जाऊन २० मिनिटं चर्चा केली. त्यामुळे शरद पवार नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्या चर्चांवर राऊतांनी पडदा टाकला. 'मी शरद पवार यांना आठवडयातून दोनपेक्षा अधिक वेळा भेटलो आहे. मला पवारांची भेट घ्यायला, त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा करायला, त्यांचे विचार ऐकायला आवडते', असेही राऊत म्हणाले. (Sanjay Raut Answer weather Sharad Pawar angry on CM Uddhav Thackeray in Mahavikas Aghadi)
"तिन्ही पक्षांचे सरकार व्यवस्थित सुरू आहे. काही गोष्टींना केव्हा तरी तरी पूर्णविराम द्यावाच लागेल. सरकारला आता दोन वर्षे पूर्ण होत आहे. मनुष्य म्हटल्यावर मतभेद असू शकतात. पण नाराज कुणीच नाही. विरोधी पक्षाला हवे असलेलं घडत नाहीये. अनिल देशमुख, प्रताप सरनाईकांची बाजू समजून घेतली पाहिजे. त्यांची कोंडी केली जातेय. भाजपमध्ये धुतल्या तांदळाचे आहेत का? हरिश्चंद्राचे अवतार आहेत का? त्यामुळे तिन्ही पक्ष यावर एकत्र बसून पुढील वाटचाल ठरवली जाईल", असे संजय राऊत यांनी नमूद केले.
"विरोधी पक्षाची भूमिका ठोस दिसत नाही. फडणवीस संन्यास घेण्याची भाषा करतात हे त्यांच्या पक्षाचे वैफल्य आहे. अहमदाबादमध्ये कुणालाही भेटल्याचा इन्कार शरद पवारांनी केला आहे. मोदी-ठाकरे यांच्यात चर्चा झाली असली, तरी त्याचा वेगळा अर्थ काढायची गरज नाही. या दोन्ही बैठकांमागे काहीही राजकारण नाही. महाराष्ट्रात सध्याचे सरकार ५ वर्षे टिकणार हे ठामपणे सांगतो", असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
"सरकारमध्ये कुठलही मतभेद नाहीत. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक व्हावी अशी सगळयांचीच इच्छा आहे. निवडणूक कधीही झाली तरी महाविकास आघाडीचाच उमेदवार जिंकेल. निवडणुकीची परिक्षा द्या असं विरोधी पक्ष म्हणतो. पण जेव्हा आम्हाला परिक्षा द्यायची असेल तेव्हा आम्ही देऊ. परिक्षेचा पेपर सेट झाला आहे. त्यामुळे कुणाचे काय फुटेल ते पाहता येईल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.