"लोकांचा जगण्यासाठी संघर्ष; दिल्लीचा चेहरामोहरा बदलून काय होणार?"

"भांड्याला भांडं लागायचंच, पण आमची भांडी काचेची नाहीत..."
central vista
central vistasakal media
Updated on

मुंबई- कोरोनामुळे देशभरात हाहा:कार माजला आहे. असे असताना नव्या संसदेचे बांधकाम २४ तास अखंड आणि वेगाने सुरू आहे. दिल्लीत कडक लॉकडाउन असताना नवीन संसदेच्या कामासाठी मात्र मजूर आणले जात आहेत. त्यामुळे देश आर्थिक समस्येत असताना हजारो कोटींची उधळपट्टी थांबवा अशी मागणी नागरिक आणि विरोधी पक्षांकडून केली जात आहे. शिवसेनेचे संजय राऊत यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली. याशिवाय, आघाडीत बिघाडीच्या चर्चा आणि बंगाल निवडणूकांमुळे उद्भवलेला नवा कोरोना उद्रेक या मुद्द्यांवरही त्यांनी परखड मत व्यक्त केले. (Sanjay Raut Answers Central Vista NCP Shivsena Spat Corona Outbreak)

central vista
पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह गायब? संजय राऊत म्हणतात...

सेंट्रल विस्टाबद्दल...

"देशातील प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांनी पंतप्रधानांना या संदर्भात पत्र लिहिले आहे. 'सेंट्रल विस्टा'चा पैसा हा सध्या कोरोनासाठी वापरण्यात यावा. दिल्लीचा चेहरामोहरा बदलून सध्या काय करणार? कारण लोक सध्या जगण्यासाठी संघर्ष करत आहेत. स्टॅलिन, ममतादीदी, सोनिया गांधी सर्वांनीच पत्र लिहिले आहे. अशा परिस्थितीत एखाद्या शहराचा कायापालट करण्यापेक्षा नागरिकांच्या आरोग्याची काळजी केली पाहिजे", असे राऊत म्हणाले.

central vista
कुंभमेळ्यावर बोलणारे बोलभांड आता कुठे आहेत? - भाजपा आमदार

आघाडीत बिघाडी?

"जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. ते महाविकास आघाडीमधले महत्त्वाचे मंत्री आहेत. अनुभवी नेते आहेत. त्यांनी काल स्वतः पत्रकार परिषद घेऊन त्याबाबत खुलासा केलाय. तो खुलासा अत्यंत महत्वाचा आहे. कॅबिनेटमध्ये भांड्याला भांडे लागले असेल पण आमची भांडी काचेची नाहीत. त्यामुळे ती फुटणार नाहीत किंवा त्याला तडाही जाणार नाही. कितीही कोणीही अफवा पसरविल्या तरी महाविकास आघाडी सरकार हे स्थिर आहे मजबूत आहे", असा पुनरुच्चार त्यांनी केला.

central vista
आजोबांचं क्वारंटाइन संपलं; नातेवाईक आणायला गेले अन् बसला धक्का

बंगाल निवडणूका आणि कोरोनाचा उद्रेक...

बंगाल निवडणुकांमध्ये झालेला कोरोनाचा उद्रेक यासाठी निवडणूक आयोग सर्वाधिक जबाबदार आहे असं मला वाटतो. निवडणूक आयोग यातील सर्वात मोठा गुन्हेगार आहे. त्या राज्यात आठ टप्प्यामध्ये निवडणूक खेचून घेऊन जाण्याची काहीच गरज नव्हती. त्यात राजकारण होतं यात वादच नाही. त्यामुळे कोरोना कोरोना संक्रमणाला गती मिळाली हे देशाचं दुर्भाग्य आहे", असे रोखठोक मत त्यांनी व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()