Sanjay Raut : "दावोसमध्ये कितीही करार झाले तरी..." ; संजय राऊतांचा शिंदे सरकारवर निशाणा

Sanjay Raut on Eknath Shinde
Sanjay Raut on Eknath Shinde
Updated on

मुंबई : महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक यावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत दावोस येथील परिषदेला गेले आहेत. २० उद्योगांचे महाराष्ट्र सरकारशी १ लाख ४ कोटी रुपयांचे करार होण्याची शक्यता, एवढे मोठे करार होण्याची ही पाहिच वेळ, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले. (Sanjay Raut on Eknath Shinde)

दावोसमध्ये कितीही करार झाले असले तरी प्रत्यक्षात जेव्हा गुंतवणूक महाराष्ट्रात येईल तेव्हाच त्यासंदर्भात वक्तव्य करु असे संजय राऊत म्हणाले. तसेच जे उद्योग महाराष्ट्रातून निघून गेले त्यासंदर्भात देखील मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करावे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. 

हेही वाचा - भारतीयांनी जगाला डिजिटल पेमेंट शिकवायची आलीये वेळ...

तसेच महाराष्ट्रात १ लाख ४ कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात येत असेल तर स्वागत आहे. त्याही पेक्षा गंभीर गोष्ट म्हणजे अडीच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात होणार होती ती आमच्या डोळ्यासमोर निघून गेली. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ते उद्योग परत आणण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. दावोसला गुंतवणूकदारांची जागतिक जत्रा भरते. त्या जत्रेतून सव्वालाख कोटी आणणार आहेत. ते आल्यावर आम्ही बोलू, असे संजय राऊत म्हणाले. 

Sanjay Raut on Eknath Shinde
अर्जुन खोतकरांच्या जावयावर मोठी कारवाई; क्रिप्टोकरंसीमध्ये 500 कोटींचा घोटाळा

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत काश्मीरमधे सामील होणार असून तिथे कश्मीरी पंडितांची भेट घेणार असल्याचे संजय राऊत म्हणाले. 

Sanjay Raut on Eknath Shinde
G20 Conference : परदेशी पाहुण्यांच्या हाती टाळ अन् लेझीम

शिवसेना पक्ष चिन्हावर आज सुनावणी होणार आहे. यावर संजय राऊत म्हणाले, "शिवसेना कुणाची हा तांत्रिक मुद्दा निवडणूक आयोगाकडे जाऊ शकतो. ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने निर्णय दिले त्यावरुन हे कळते की काय होणार आहे. पण शिवसेना कुणाची हा प्रश्न महारष्ट्रात निर्माण होऊ शकत नाही. शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचीच असले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आहे तीच शिवसेना आहे."

Sanjay Raut on Eknath Shinde
Geyserचा बाँबसारखा स्फोट होतो, तुम्हीही नकळत ही चूक करताय का? वेळीच व्हा सावध, नाहीतर...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.