Sanjay Raut: "संजय राऊतच खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार," निरुपम यांचे खळबळजनक आरोप

Sanjay Nirupam: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मुंबईतील उमेदवार जाहीर केल्यानंतर संजय निरुपम काँग्रेस नेतृत्त्वासह उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर खरमरीत टीका केली होती.
Sanjay Nirupam And Sanjay Raut
Sanjay Nirupam And Sanjay RautEsakal
Updated on

महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपावरून ठिणगी पडली आहे. अशातच मुंबईतील बहुतांशा जागा उद्धव ठाकरे यांच्या वाट्याला गेल्याने संजय संजय निरुपम यांच्या काँग्रेसकडून लोकसभा लढण्याच्या सर्वा आशा मावळल्या होत्या.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मुंबईतील त्यांचे उमेदवार जाहीर केल्यानंतर संजय निरुपम काँग्रेस नेतृत्त्वासह उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर खरमरीत टीका केली होती.

यानंतर काँग्रेसने निरुपम यांचे पक्षातून निलंबन केले होते. आता संजय निरुपम यांनी शिवसेनेच्या संजय राऊत यांना टार्गेट केले आहे.

आज एक पत्रकार परिषद घेत मुंबईतील खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार संजय राऊत असल्याचा आरोप केला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना संजय निरुपम म्हणाले, संजय राऊत हे खिचडी घोटाळ्याचे प्रमुख सूत्रधार आहेत. त्यांनी यामध्ये त्यांची मुलगी, भाऊ आणि साथीदाराच्या नावे लाच घेतली आहे.

यामध्ये 29 मे 2020 मध्ये पहिल्यांदा राऊत यांच्या मुलीच्या खात्यावर 3 लाख 50 हजार रूपये आले. यानंतर 26 जून 2020 मध्ये 5 लाखांचे आणि पुढे 7ऑगस्ट 2020 मध्ये 1 लाख 25 हजारांचे पेमेंट आल्याचे आरोप निरुपम यांनी केले आहेत.

Sanjay Nirupam And Sanjay Raut
Raj Thackeray: गुढीपाडवा मेळाव्यासाठी मनसे सज्ज; जाणून घ्या कशी केलीये तयारी

माजी काँग्रेस नेते संजय निरुपम पुढे म्हणाले, "आज ईडीने उत्तर पश्चिम मुंबईतील शिवसेनेचे (यूबीटी) उमेदवार अमोल कीर्तीकर यांना समन्स बजावले आहे. खिचडी चोरांवर नक्कीच कारवाई झाली पाहिजे. खिचडी घोटाळ्याचे सूत्रधार संजय राऊत आहेत. आणि त्यांनी आपली मुलगी, भाऊ आणि साथीदाराच्या नावावर पैसे घेतले आहेत."

Sanjay Nirupam And Sanjay Raut
Ajit Pawar: पार्थ पवारांचा दारुण पराभव करणाऱ्या बारणेंच्या प्रचाराला अजित पवार!

वास्तविक, मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून तिकीट न मिळाल्याने संजय निरुपम संतापले होते. राज्यात काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार महाविकास आघाडीत आहेत.

निरुपम यांना मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून तिकीट हवे होते, तिथून शिवसेनेच्या उद्धव गटाने अमोल कीर्तिकर यांना तिकीट दिले आहे. खुद्द निरुपम यांना राहुल गांधी यांनी येथून तिकीट देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही, असे सांगितले जाते.

तिकीट न मिळाल्याने निरुपम यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडी विरोधात मोहिम उघडली होती, त्यानंतर काँग्रेसने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.