अब संजय राऊत की बारी; किरीट सोमय्यांचं सूचक ट्वीट

कालच माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे.
Sanjay Raut Kirit somaiya
Sanjay Raut Kirit somaiyaSakal
Updated on

महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजपा नेते किरीट सोमय्या चांगलेच सक्रीय झाले होते. सरकारमधले अनेक मंत्री, शिवसेना नेते त्यांच्या रडारवर होते. अनिल परब, प्रताप सरनाईक, भावना गवळी, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊतांवरही कारवाई करण्याची मागणी ते करत होते. त्याच पार्श्वभूमीवर आता सोमय्यांनी नवं ट्वीट केलं आहे. (Kirit Somaiya tweeted about Sanjay Raut)

Sanjay Raut Kirit somaiya
संसार में सबसे आसान काम अपनेको धोखा देना हैं - संजय राऊत

सोमय्या यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि आरोपांमुळे अनेक शिवसेना तसंच राष्ट्रवादीच्या नेत्यांना चौकशीला सामोरं जावं लागलं आहे. आता संजय राऊतांची पाळी आहे, असं सूचक ट्वीट किरीट सोमय्या यांनी केलं आहे. त्यामुळे आता संजय राऊतांच्या (Sanjay Raut) ईडी चौकशीकडे लक्ष लागून राहिलं आहे.

आज मुंबई ईडी कार्यालयात संजय राऊत यांना हजर राहण्याचं समन्स आलं आहे.गोरेगाव पत्राचाळ जमीन घोटाळ्यासंदर्भात चौकशीसाठी त्यांना हे समन्स (ED Summons) आहे. मात्र पावसाळी अधिवेशन दिल्लीत सुरू आहे. त्यामुळे राऊत यांचे वकील वेळ मागून घेणार असल्याची माहिती आहे.

गोरेगाव पत्राचाळ जमीन घोटाळ्या विषयी किरीट सोमय्या यांनी पाठपुरावा केला होता. काल याआधी ही सोमय्या यांनी अनिल देशमुख (Anil Deshmukh), नवाब मलिक (Nawab Malik) तसेच अनिल परब (Anil Parab) यांना चौकशीला सामोरे जावे लागल आहे आणि आता संजय राऊत यांना देखील चौकशीला सामोरे जावं लागणार आहे. त्यामुळे असं ट्विट किरीट सोमय्या यांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.