'राऊतांकडून भाजपातील समस्त महिलांचा विनयभंग'; आक्षेपार्ह शब्दावरुन तक्रार दाखल

'राऊतांकडून भाजपातील समस्त महिलांचा विनयभंग'; आक्षेपार्ह शब्दावरुन तक्रार दाखल
Updated on

मुंबई: संजय राऊत यांना दिल्लीत पत्रकार परिषदेत शरद पवारांसाठी खुर्ची घेऊन जात असल्याच्या एक फोटो तुफान व्हायरल झाला आहे. त्यांच्या या फोटोचे वेगवेगळे अर्थ काढले जात असून त्यावर काही ठिकाणी खिल्ली तर काही ठिकाणी टीका केली जात आहे. बहुतांश भाजप नेत्यांनी या व्हायरल फोटोवरुन संजय राऊत आणि शिवसेनेवर खोचक टीका केली आहे. भाजपकडून करण्यात येणाऱ्या या टीकेबाबत संजय राऊत यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी आक्षेपार्ह शब्द उच्चारून या टीकेला प्रत्युत्तर दिलं. त्यांच्या या प्रत्युत्तराची देखील जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी उच्चारलेल्या शब्दामुळे समस्त भाजप नेत्यांचा अपमान झाला असल्याचा दावा करत भाजप महिला आघाडीने त्यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. एकीकडे आशिष शेलार यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर आता संजय राऊत यांच्यावरही या टीकेबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी भाजप नेते आक्रमक झाले आहेत.

'राऊतांकडून भाजपातील समस्त महिलांचा विनयभंग'; आक्षेपार्ह शब्दावरुन तक्रार दाखल
दिल्लीतील शेतकऱ्यांचं आंदोलन संपलं, तंबू काढायला सुरुवात

भाजपच्या माहिममधील नगरेसविका शीतल गंभीर यांनी संजय राऊत यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. संजय राऊतांनी जे शब्द वापरलेत त्याच्याविरोधात आम्ही जबाब दिलेला आहे तसेच आम्ही गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे, असं त्यांनी म्हटलंय. तसेच पोलीस गुन्हा दाखल करतील असा आम्हाला विश्वास आहे, असंही त्या म्हणाल्या आहेत.

काय म्हटलंय तक्रारीत?

संजय राऊत यांनी आक्षेपार्ह शब्द वापरुन लैंगिक शेरे करुन भाजप पक्षातील समस्त महिला वर्गाचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्यांची प्रतिमा मलिन केली आहे. त्यांचे हे शब्द अत्यंत बिभत्स, अश्लिल तसेच मनास लज्जा उत्पन्न करणारे असून त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

'राऊतांकडून भाजपातील समस्त महिलांचा विनयभंग'; आक्षेपार्ह शब्दावरुन तक्रार दाखल
'शरद पवारांनी ठरवलंय... 2024 मध्येही उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री'

संजय राऊत काय म्हणाले होते?

भाजपा नेते टीका करत असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “लालकृष्ण अडवाणी जरी तिकडे असते तर मी त्यांनाही खुर्ची दिली असती. शरद पवार यांची प्रकृती, त्यांचं वय आणि त्यांना होणारा त्रास हे पाहता केलेली ती कृती होती. त्या आंदोलनात ते माझ्यासोबत आले होते. त्यांना चालतानाही त्रास होत होता तसेच त्यांना मांडी घालून बसता येत नाही. त्यांच्या पायाला त्रास आहे. अशावेळी महाराष्ट्रातील एका वडीलधाऱ़्या व्यक्तीला मी स्वत: खुर्ची आणून दिली हे जर कोणाला आवडलं नसेल तर ही महाराष्ट्राची संस्कृती नसून नवी विकृती आहे”, असं त्यांनी म्हटलं होतं.

दरम्यान पुढे ते म्हणाले होते की, बाळासाहेब हेच माझे गुरु आहेत. त्यांनीच मला हे संस्कार दिले असून यशवंतराव चव्हाण आमचे आदर्श आहेत. त्यांना सांगा की प्रत्येक ठिकाणी राजकारण चालत नाही, त्यामुळे ही चु** बंद करा. अशाने राज्यात तुमची सत्ता कधीच येणार नाही. तुमच्या डोक्यातील कचरा साफ केला नाहीत तर एखाद्या डंपिंग ग्राऊंडमध्ये लोक तुम्हाला गाढून टाकतील, असाही खोचक टोला त्यांनी लगावला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()