Sanjay Raut : संजय राऊत यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे आंदोलन, राऊत यांच्या पोस्टरवर थुंकून केला निषेध व्यक्त

संजय राऊत यांनी या कृत्यावर आपले म्हणणे मांडले आहे. राऊत म्हणाले, गद्दारांचे नाव घेताच माझी जीभ चावली गेली.
Sanjay Raut
Sanjay Rautsakal
Updated on

Sanjay Raut - शिंदे गटविषयी प्रश्न विचारताच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी थुंकण्याची क्रिया केली होती. राऊत यांनी केलेल्या कृत्याचा शनिवारी शिंदे गटाकडून निषेध व्यक्त करण्यात आला. डोंबिवलीत शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेबाहेर शिवसैनिकांनी राऊत यांच्या प्रतिमेस जोडे मारत तसेच त्यावर थुंकत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

डोंबिवली शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेजवळ युवा सेना महाराष्ट्र प्रदेश सचिव दीपेश म्हात्रे, डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश कदम, सागर जेधे यांसह अनेक कार्यकर्त्यांनी यात सहभाग घेतला. यावेळी राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व संजय शिरसाठ यांच्या बद्ल संजय राऊत यांनी अपशब्द वापरून तसेंच त्यांच्या नावे थुंकून घाण कृत्य केल्या बद्दल आज हे आंदोलन करण्यात आले.

Sanjay Raut
Pune : स्वच्छ पुण्यासाठी नवे पाऊल! पुनर्वापर होऊ शकणाऱ्या वस्तू येथे करा जमा

संजय राऊत यांनी या कृत्यावर आपले म्हणणे मांडले आहे. राऊत म्हणाले, गद्दारांचे नाव घेताच माझी जीभ चावली गेली. त्यामुळे मी खरे तर थुंकलो. मात्र, गद्दारांना वाटते मी त्यांच्यावरच थुंकलो. हे खरे आहे की महाराष्ट्रातील जनता त्यांच्यावर थुंकत आहे. त्यामुळे सतत आपल्यावर कोणी ना कोणी थुंकत आह,

Sanjay Raut
Mumbai Local: उद्या पश्चिम रेल्वेवर १४ तासांचा ब्लॉक; या गाड्यांवर होणार परिणाम, जाणून घ्या वेळापत्रक

अशी भीती गद्दारांना वाटत आहे. बेईमान्यांवर वीर सावरकरही थुंकले होते हा इतिहास आहे. मी तशी कृती केली तर चूक काय? असंही संजय राऊत यांनी म्हटले आहे. राऊत यांच्या कृतीवर सेना महाराष्ट्र प्रदेश सचिव दीपेश म्हात्रे म्हणाले, राऊत यांचा धंदा हाच आहे. रोज उठायचं आणि कोणावर तरी टिका करायची. त्यांनी हे केलं नाही तर त्यांचा धंदा बंद होईल. त्यांना लवकरच त्यांची जागा दाखवून देऊ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.