पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह गायब? संजय राऊत म्हणतात...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून पंतप्रधान, गृहमंत्र्यांवर टीका
Sanjay-Raut-Pm-Modi-Amit-Shah
Sanjay-Raut-Pm-Modi-Amit-Shah
Updated on
Summary

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून पंतप्रधान, गृहमंत्र्यांवर टीका

मुंबई: देशात कोरोनाबाबतची (Coronavirus) भयावह परिस्थिती ओढवली आहे. मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) या संदर्भात काहीच बोलत नाहीत, असा आरोप विरोधी पक्षांकडून (Opposition) सातत्याने केला जात आहेत. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह गायब आहेत, अशा प्रकारे त्यांची खिल्ली काँग्रेसकडून (Congress) उडवली जात आहे. या मुद्द्यावरील प्रश्नावर शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उत्तर दिलं. पंतप्रधान आणि गृहमंत्री देशातच आहेत पण त्यांचे अस्तित्व जाणवेल अशा उपाययोजना त्यांच्याकडून केल्या जायला हव्यात, अशा शब्दात त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. (Sanjay Raut Reaction PM Narendra Modi Amit Shah Missing)

Sanjay-Raut-Pm-Modi-Amit-Shah
"उद्धव ठाकरे, तुम्ही कितीही PR एजन्सी नेमल्यात तरी..."

"कोणी काहीही म्हणत असेल तरी मी सांगतो की पंतप्रधान गायब नाहीत. ते आहेत आणि ते मुख्यमंत्र्यांची व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करतात. गृहमंत्रीदेखील आहेत, ते देखील चर्चेत उपस्थित असतात. पण ते दोघे दिसून येत नसल्याच्या तक्रारी आहेत. या देशात सरकार आहे, प्रशासन आहे, पंतप्रधान आहेत, आरोग्य मंत्रीही आहेत, केंद्र सरकारदेखील जागेवरच आहे पण त्यांचे अस्तित्व जाणवेल अशाप्रकारे कार्यप्रणाली वापरणं गरजेचं आहे. कोणाचेही अस्तित्व अदृश्य होऊन चालणार नाही", असं स्पष्ट मत राऊत यांनी व्यक्त केलं.

Sanjay-Raut-Pm-Modi-Amit-Shah
आजोबांचं क्वारंटाइन संपलं; नातेवाईक आणायला गेले अन् बसला धक्का

"ज्याप्रकारे कोरोनामुळे लोकांचा मृत्यू होतोय, लोकांची प्रेतं गंगा, यमुना नदीत सापडत आहेत, त्यावरून देशात हाहाकार माजला आहे हे स्पष्ट होतंय. प्रभू श्रीराम यांच्या अयोध्येतही ऑक्सिजनअभावी मरत आहेत. मृतदेहांचा खच सध्या नदीकाठी दिसून येतोय. मृतदेहावर व्यवस्थित अंत्यसंस्कार होत नाहीत, अशी अवस्था याआधी कधीही झाली नव्हती. केंद्र सरकार, पंतप्रधान, आरोग्यमंत्री यांनी कोणताच अहंकार न बाळगता 'महाराष्ट्र मॉडेल' देशात लागू करायला हवं होतं. अहंकार आणि राजकारण उपाययोजना करण्यात आल्या, तर देशातील परिस्थिती नक्की सुधारेल", असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.