Sanjay Raut said about MVA alliance formula of Election
मुंबई- महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असून जिंकेल त्याची जागा हे सूत्र आहे, असं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय. गुरुवारी मातोश्रीवरील बैठकीत काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्यासह इतर काँग्रेस नेते, राष्ट्रवादीचे नेते होते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात ही बैठक पार पडली, अशी माहिती संजय राऊत यांनी दिलीये.
महाराष्ट्रात महाविकास आघाडी अत्यंत मजबूत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र लढणार. तीन पक्ष असल्याने अनेकांना तडजोडी कराव्या लागतील. त्याला आमची तयारी आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाच्या प्रमुखांनी ठरवलंय की, जागा वाटपावरुन कुठेही मतभेद उघड करायचं नाही. आपल्याला एकत्र यायचंय आणि निवडणुका जिंकायच्यात. जागेचा हट्ट धरायचा नाही, जिंकेल त्याची जागा हे सूत्र ठरलेलं आहे, असं ते म्हणाले.
सिनेटची निवडणूक रद्द करण्यात आली आहे. यात धक्का बसण्यासारखं काही नाही.या राज्यातलं सरकार कोणतीही निवडणूक भीतीपोटी घ्यायला तयार नाही. सिनेटच्या निवडणुकीत युवा सेनेचे पॅनल शंभर टक्के जिंकणार होतं. ही भीती सरकारला होती, त्यामुळे निवडणुका रद्द केल्या. मी म्हणतो किती निवडणुका रद्द करणार आहात. तुम्ही महानगरपालिकेच्या निवडणुका घेत नाही कारण तुम्हाला भीती आहे ठाकरे गट जिंकेल याची, असं राऊत म्हणाले.
लोकसभेच्या चंद्रपूर आणि पुण्याच्या जागावर निवडणुका घेत नाहीत. त्यांना माहितेय की भाजप हरणार. भीतीपोटी तुम्ही लोकसभेच्या निवडणुका रद्द करणार का? हे लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम सुरु आहे. सिनेटच्या निवडणुका जिंकणार होतो, त्यामुळे त्यांनी अपशकुन केला, अशी टीका त्यांनी केली.
निवडणुका घ्यायच्या नाहीत आणि निवडणुका न घेता सत्ता गाजवायची असे धोरण सरकारचं सुरु आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नागपुर या मोठ्या शहरांना महापौर नाही. महापौर शहराचे सौभाग्य असतं. पण, तुम्ही हरणार अशी भीती असल्याने तुम्ही निवडणुका घेत नाहीये, असं राऊत म्हणाले. (Latest Marathi News)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.