Sanjay Raut : ‘जोपर्यंत आमची इच्छा आहे; तोपर्यंत महाविकास आघाडीसोबत राहू - संजय राऊत

शिवसेनेच्या राज्यव्यापी शिबिरात राऊत यांनी पदाधिकारी-कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले
sanjay raut statement on mahavikas aghadi politics uddhav thackeray  mumbai
sanjay raut statement on mahavikas aghadi politics uddhav thackeray mumbaiesakal
Updated on

मुंबई : सत्ताधारी भाजपला शह देण्यासाठी विरोधक ‘एकजूट’ करीत असतानाच महाविकास आघाडीत राहण्याबाबत भूमिका मांडून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खळबळ उडवून दिली. ‘जोपर्यंत आमची इच्छा आहे; तोपर्यंत महाविकास आघाडीसोबत राहू, ’ असे वक्तव्य राऊत यांनी रविवारी केले. विशेष म्हणजे, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असतील, असेही राऊत यांनी सूचित केले.

शिवसेनेच्या राज्यव्यापी शिबिरात राऊत यांनी पदाधिकारी-कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी भावी मुख्यमंत्र्यांचा मुद्दा उकरून काढत, राऊत यांनी आघाडीतील घटक पक्षांतील तेही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतील नेत्यांना इशाराच दिल्याचे मानले जात आहे. त्यामुळे आघाडीतील घटक पक्षांतील नव्या वादाला तोंड फुटण्याचीही शक्यता आहे. दुसरीकडे, राऊत यांच्या भूमिकेमुळे आघाडीसोबत सत्ताधारीही अवाक झाले आहेत.

sanjay raut statement on mahavikas aghadi politics uddhav thackeray  mumbai
Shiv Sena : 'छापखान्यातून गायब झालेले ८८ हजार कोटी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात वापरले?' राऊतांचा गंभीर आरोप

उद्धव ठाकरेंचा विद्यमान मुख्यमंत्री असा उल्लेख करत राऊत म्हणाले, ‘‘सध्या महाराष्ट्रात भावी मुख्यमंत्रिपदाचे पीक जोरात आहे. पाहावे तिकडे भावी मुख्यमंत्री दिसत आहेत. आपण महाविकास आघाडीसोबत आहोत आणि जोपर्यंत आपली इच्छा आहे, तोपर्यंत राहू. ज्यावेळी जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो घेऊ. मात्र, विद्यमान मुख्यमंत्री (उद्धव ठाकरे) पुढे बसले आहेत. ते काही आमच्या इच्छांवर नाही. ते राजकारण आहे.’’

sanjay raut statement on mahavikas aghadi politics uddhav thackeray  mumbai
PM Modi US Visit : मोदींच्या अमेरिका दौऱ्यात होणार अंतराळ संबंधांवर चर्चा; गगनयान मोहिमेसाठी नासा करू शकतं मदत

मोदी, शहाही शिवसेनेत येतील

न्यायालयाने हे सरकार घटनाबाह्य ठरवले असून, पुढील ५० दिवसांत नवे सरकार आणायचे आहे. २०२४ च्या निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेही शिवसेनेत येतील, असा टोलाही राऊत यांनी लगावला. अहमदाबादमध्ये क्रिक्रेटचे मैदान उभारून, मुंबईतील क्रिकेटचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचाही आरोपही राऊत यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.