संजय राऊत यांनी भाजपला अप्रत्यक्षपणे इशारा दिलाय. भाजप जर पर्यायांचा विचार करत असेल, तर शिवसेनेकडेही पर्याय उपलब्ध आहे, असं विधान संजय राऊथ यांनी केलंय. संजय राऊतांनी शिवसेना आपल्या मागणीवर ठाम असल्याचं म्हटलंय.
दरम्यान, भाजपला इशारा देतानाच संजय राऊत यांनी शरद पवारांचीही स्तुती केली आहे. इतकंच नाही, तर हरियाणातील सत्तास्थापनेवरुही राऊतांनी भाजपवर निशाणा साधला. "महाराष्ट्रात कुणीही दुष्यंत नाही, ज्यांचे वडील जेलमध्ये आहेत" असं म्हणत संजय राऊत यांची भाजपला टपली लगावली आहे.
लोकसभा निवडणुकांच्या आधी जो फॉर्म्युला ठरलाय, त्यावर शिवसेना आग्रही आहे. दरम्यान शनिवारी झालेल्या बैठकीतही शिवसेनेही आक्रमक भूमिका घेतली होती. निवडणुकीचा निकाल आता बरेच दिवस उलटले, तरी सत्ता स्थापनेबाबतच्या हालचालींना महायुतीत म्हणावा तसा वेग आलेला नाहीये. या आधारावरच महायुतीत तणाव असल्याचं बोललं जातंय.
शिवसेना आणि भाजपला मिळणाऱ्या अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यामुळे दोन्ही पक्षांचं संख्याबळ वाढलंय. शिवसेनेला काल नेवासाचे आमदार शंकरराव गडाख यांनी पाठिंबा दिलाय. तर आज भाजपला दोन अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिलाय. शिवसेनेचं संख्याबळ आता 61 वर पोहोचलंय.. तर भाजपचं संख्याबळ आता 110वर पोहोचलंय. भाजपला उरण मतदारसंघातील अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिलाय. तसेच विनोद अग्रवाल यांनीही भाजपला पाठिंबा दर्शवलाय. त्यामुळे आता महायतुतीमध्ये संख्याबळ वाढवण्याची स्पर्धा सुरु झाली असल्याची चर्चा रंगली आहे.
काल शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी मिशन गडाख फत्ते केलं. त्यानंतर गडाखांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत शिवसेनेला पाठिंबा दर्शवलाय. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी गीता जैन, राजेंद्र राऊत यांनी भाजपला पाठिंबा दिलाय. दुसरीकडे आज भाजपला आणखी दोन अपक्षांनी पाठिंबा दिलाय.
Webtitle : sanjay raut taunts bjp over government formation in Haryana
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.