विकास दुबे एन्कॉंन्टर प्रकरणी संजय राऊतांची मोठी प्रतिक्रीया, वाचा सवित्तर

विकास दुबे एन्कॉंन्टर प्रकरणी संजय राऊतांची मोठी प्रतिक्रीया, वाचा सवित्तर
Updated on

मुंबई – उत्तर प्रदेशातील 8 पोलिस अधिकाऱ्यांची हत्या करून फरार झालेला कुख्यात गुंड विकास दुबेला गुरूवारी उज्जैन येथून अटक करण्यात आली होती. त्याला कानपूर येथे नेत असतांना पोलिसांच्या ताफ्याचा अपघात होऊन एक कार पलटी झाली. त्यादरम्याने विकासने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता. आणि पोलिसांची शस्त्रे हिसकाऊन गोळीबार करण्याचा प्रयत्न करताना, पोलिसांनी त्याचा एन्कॉन्टर केला. त्यावर देशातील अनेक राजकीय प्रतिक्रीया उमटत आहेत. खासदार संजय राऊत यांनी पोलिसांची हत्या केली गेली तेव्हा, उत्तर प्रदेश सरकारवर सडकून टीका केली होती. आता त्यांनी या एन्कॉंन्टर नंतर आपली भूमिका मांडली आहे.

देशातील कोणत्याही राज्यातील अशा प्रकारची घटना घडत असेल. तर अपराध्यांना त्वरीत शिक्षा व्हायला व्हायला हवी. उत्तर प्रदेश पोलिसांनी आपल्या सहकाऱ्यांच्या हत्येचा बदला घेतला आहे. या विषयावर राजकारण होता कामा नये. आपल्यासाठी सर्वात महत्वाचं आहे, ते म्हणजे त्या आठ शहिद पोलिसांना त्वरित न्याय मिळणे. तो मिळाला आहे. पोलिसांच्या कौतुकास्पद कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे म्हणजेच पोलिसांचे मनोधर्य खच्ची करण्यासारखे होईल. मुंबईत देखिल अशा प्रकारचे एन्कॉंन्टर असंख्य वेळा झाले आहे. गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी .ही कठोर पाऊले उचलने गरजेचे असते.

आपण थेट एन्कॉंन्टरचे समर्थन करू शकत नाही. परंतु जर बड्या पोलिस अधिकाऱ्याची हत्या करण्याचे धाडस कोणी करत असेल तर, उत्तर पोलिस पोलिसांनी केलेल्या कारवाईचे समर्थन करायला हवे.. गुडांवर पोलिसांचा धाक नाही राहिला तर, देशात कायद्याचा धाक राहणार नाही. 

विकास दुबेच्या राजकीय कनेक्शन बाबत म्हणाल, तर त्याचे सर्वच पक्षांशी संबध होते त्यामुळे या प्रकरणात कोणत्याही एका पक्षाला दोषी धरून चालणार नाही. आता सर्वात महत्वाचं म्हणजे पोलिसांचे मनोधर्य वाढवणे. आणि अशी प्रकरणे पु्न्हा घडू नयेत म्हणून कायद्याचा धाक गुंडामध्ये बसावा. राजकाराणाचं गुन्हेगारीकरण आतापर्यंत होत होतं, परंतु गुन्हेगारीच राजकारण आता होऊ पाहत आहे. हे आपल्या देशासाठी घातक आहे. आधी राजकारणी गुन्हेगारांचा वापर करून घेत होते. आता गुन्हेगारच राजकारणात येत आहेत. हे देशातील एकाच राज्यात होत आहे असे नाही. परंतु अनेक राज्यांमध्ये पाहयला मिळत आहे.

अखिलेश यादव यांच्या बाबत बोलतांना राऊत म्हटले की, अखिलेश हे त्या राज्याचे विरोधीपक्षनेते आहेत. त्यामुळे अशा प्रकरणांवर त्यांनी राजकीय विरोध करणे स्वाभाविक आहे. परंतु त्यांनीही अशा प्रकरणांमध्ये सांभाळून आरोप करणे गरजेचे आहे. अशा वेळी लोकांच्या भावना उग्र असतात. त्यामुळे एन्कॉंटरचे समर्थन संजय राऊत यांनी केले आहे.

-----------------------------------------------

(संपादन - तुषार सोनवणे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.