मुंबई - देशभरात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंद (Bharat bandh) ला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी बंद बाबत प्रतिक्रीया दिली आहे. त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanwis) यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. फडणवीसांनी 10 वर्षापूर्वीचे बोलू नये, आजचे बोलावे, आणि बोलताना 10 वेळा विचार करावा असे राऊत यांनी म्हटले आहे.
राज्यासह देशात कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मक्तेदारी संपवून पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नेहमीच केले आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सरकाराच्या काळातही त्यासाठी कायदे केले झाले. त्यांच्याकडून होत असलेला विरोध हा दुटप्पी पणा असून अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यासंदर्भात संजय राऊत यांनी माध्यमांत प्रतिक्रीया दिली आहे.
' गेल्या 10 ते 12 दिवसांपासून शेतकरी थंडी वाऱ्याची पर्वा न करता, सरकारच्या दडपशाहीची पर्वा न करता दिल्लीच्या सीमारेषेवर संघर्ष करतोय. त्याला पाठिंबा देणे देशातीलच नव्हे तर जगातील नागरिकांच कर्तव्य आहे.दिल्लीतील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ जगातील अनेक ठिकाणी मोर्चे निघाले आहेत, सरकारने शेतकऱ्यांचं म्हणणे ऐकायलाच हवेय,' असे संजय राऊत यांनी म्हटले.
उत्खनन करायचं म्हटलं की, हे लांबपर्यंत जाईल, तुम्ही 10 वर्षापूर्वींचं बोलू नका आजकाय चाललंय ते पाहा शेतकरी आज रस्त्यावर आहे. आजचा बंद ना शिवसेनेने पुकारला, ना राष्ट्रवादीने, ना तृणमूल काँग्रेसने कोणाच्याही हातात राजकीय झेंडा नाही. आपण विरोधी पक्षनेते म्हणून काय भूमीका मांडतोय याचा फडणवीसांनी दहा वेळा विचार करायला हवा. '' अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
Sanjay Rauts criticism of Fadnavis on the issue of Bharat Bandh
-------------------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.