फोन टॅपिंगवर संजय राऊत यांचा मोठा खुलासा, भाजपच्याच मंत्र्याने..

फोन टॅपिंगवर संजय राऊत यांचा मोठा खुलासा, भाजपच्याच मंत्र्याने..
Updated on

मुंबई - संजय राऊत यांनी आज ट्विटरवरून मोठा खुलासा केला आहे. यामध्ये संजय राऊत यांनी भाजपच्याच माजी जेष्ठ मंत्र्याने माझा फोन टॅप होत असल्याचं मला कळवलं. ट्विटरच्या माध्यमातून राऊत यांनी हा खुलासा केलाय. भाजप सरकार सत्तेत असताना तत्कालीन फडणवीस सरकारने विरोधी पक्षातील आणि भाजप विरोधात स्टॅन्ड घेणाऱ्या अनेकांचे फोन टॅप केल्याचा आरोप महाराष्ट्रातील फडणवीस सरकारवर केला जातोय. आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवर एक पोस्ट लिहिली आहे. 

खासदार संजय राऊत यांचं ट्विट 

"आपके फोन टैप हो रहे है.. ये जानकारी मुझे भाजपा एक वरिष्ठ मंत्रीने भी दे रखी थी. मैने कहां था..भाई साहेब..मेरी बात अगर कोई सुनना चाहता है. तो स्वागत है..मै बाळासाहेब ठाकरेजी का चेला हूं. कोई बात या काम छुप छुपकर नही करता..सुनो मेरी बात.."

आपला फोन टॅप होतोय, ही माहिती मला भाजपच्याच जेष्ठ नेत्याने दिली होती. यावर मी बाळासाहेबांचा चेला आहे, माझ्या फोनवरील वार्ता कुणाला ऐकायच्या असतील तर त्यांचं मी स्वागतच करतो. मी कोणतंही काम लपून छपून करत नाही. मी जे करतो ते बिनधास्तपणे करतो, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे 

काँग्रेसचे जेष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी याबाबत तक्रार केली होती. भाजप सरकारच्या काळात कोरेगाव भीमा वादावेळी देखील अनेकांचे फोन टॅप होत असल्याचं त्यावेळी देखील बोललं जात होतं. दरम्यान, महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री अनिल देखम्मुख यांनी आता फोन टॅपिंग आणि स्नूपिंग संदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्रातील सायबर सेलच्यामाध्यमातून ही संपूर्ण चौकशी केली जाणार आहे. 

मागच्या फडणवीस सरकारकडून त्यावेळच्या विरोधी पक्षातील नेत्यांच्ये याचसोबत शिवसेनेच्या नेत्यांचे फोन टॅप आणि स्नूप झाल्याचं दिग्विजय सिंह यांनी बोलून दाखवलं होतं. आताच महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र सरकारने हे प्रकरण आता गांभीर्याने घेत टॅपिंग करुन नेत्यांवर पाळत ठेवण्यासाठी लागणारे स्पायवेवर घेण्यासाठी इस्रायलला कोण अधिकारी गेला होता याची चौकशी केली जातेय. पेगॅसीस नावाच्या स्पायवेअरच्या माध्यमातून हे स्नूपिंग आणि टॅपिंग केलं गेल्याची माहिती समोर येतेय. 

दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेसचे जेष्ठ नेते दिगविजय सिंह याचा फोन टॅप झाल्याचं बोललं जातंय. 

sanjay rauts tweet on phone tapping and snooping  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.