Sanjay Shirsat: संजय शिरसाटांचा सरकारला घरचा आहेर, CM एकनाथ शिंदेंना पत्र लिहित केली 'ही' मागणी

Sanjay Shirsat's Letter to CM Eknath Shinde: A Wake-Up Call for Officials : मंत्रालयातील अधिकार्‍यांची आमदार भेट घेतात आणि मतदारसंघातील कामे उरकून घेतात. मात्र, मंत्रालयात अधिकारी जाग्यावर नसल्याचा अनुभव संजय शिरसाट यांना आला आहे.
Governance in Maharashtra: Sanjay Shirsat's Letter Highlights Administrative Issues
Governance in Maharashtra: Sanjay Shirsat's Letter Highlights Administrative Issues esakal
Updated on

Non-Attendance of Officials: Sanjay Shirsat Complains to CM Eknath Shinde

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून मंत्रालयातील अधिकार्‍यांच्या अनुपस्थितीबाबत तक्रार केली आहे. शिरसाट यांनी मंत्रालयाचे अधिकारी जागेवर हजर राहत नसल्याचे पत्रात नमूद केले आहे. सगळे अधिकारी बंगल्यावर बसून काम करत असल्याने रखडलेली कामे अधिकारी करण्यास टाळाटाळ करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

रखडलेल्या कामांची तक्रार-

संजय शिरसाट यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, "पाच सहा तास रांगेत उभं राहूनही जनतेची कामं होत नाहीत. त्यामुळे या अधिकार्‍यांना मंत्रालयात हजर राहण्यास सांगावे," अशी मागणी त्यांनी केली आहे. शिरसाट यांनी अधिकार्‍यांच्या अनुपस्थितीमुळे लोकांच्या अडचणींवर प्रकाश टाकला आहे.

राजकीय वर्तुळात चर्चा-

शिरसाट हे नेहमीच चर्चेत असतात. उद्धव ठाकरे गटावर ते नेहमी टीका करत असतात. यापूर्वी, त्यांनी उद्धव ठाकरे भेटायला वेळ देत नाहीत म्हणून एकनाथ शिंदे यांच्यासोबत आल्याचे सांगीतले होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावर देखील टीका केली होती. मात्र आता त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Governance in Maharashtra: Sanjay Shirsat's Letter Highlights Administrative Issues
BJP Strategy : विधानसभेसाठी भाजपचं ठरलं! 150 पेक्षा जास्त जागा लढवणार? लोकसभा निकाल अन् सर्वेक्षण अहवालाचा घेणार आधार

प्रशासनातील समस्यांवर लक्ष-

प्रशासनामध्ये आमदार नेहमी अधिकार्‍यांच्या तक्रारी करत असतात. काही दिवसांवर विधानसभा निवडणुका आल्याने सर्व आमदार आपआपल्या मतदारसंघातील कामांवर लक्ष देत आहेत. त्यामुळे मंत्रालयातील अधिकार्‍यांची आमदार भेट घेतात आणि मतदारसंघातील कामे उरकून घेतात. मात्र, मंत्रालयात अधिकारी जाग्यावर नसल्याचा अनुभव संजय शिरसाट यांना आला आहे.

Governance in Maharashtra: Sanjay Shirsat's Letter Highlights Administrative Issues
Ladki Bahin Yojana: "विधानसभेत विरोधात काम केल्यास 'लाडकी बहिण'मधून नाव डिलिट करू," एकनाथ शिंदेंच्या आमदाराकडून धमकी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.