MHADA : संजीव जयस्वाल यांनी स्वीकारला 'म्हाडा' उपाध्यक्षपदाचा कार्यभार

Sanjeev Jaiswal
Sanjeev Jaiswal
Updated on

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार संजीव जयस्वाल यांनी आज स्विकारला.

Sanjeev Jaiswal
Crocodile, turtle survey : पेंचमध्ये आढळले ३० कासव; दुर्मिळ पानमांजराचेही अस्तित्व

जयस्वाल १९९६ च्या बॅचचे भारतीय प्रशासन सेवेतील (आय.ए. एस.) अधिकारी आहेत. म्हाडा उपाध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी जयस्वाल महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या प्रधान सचिवपदी कार्यरत होते.

सदर पदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे कायम ठेवण्यात आला आहे. जयस्‍वाल यांनी आतापर्यंत महत्‍त्‍वपूर्ण अशा विविध पदांवर काम केले आहे. यामध्‍ये प्रामुख्‍याने सहाय्यक जिल्‍हाधिकारी म्‍हणून नाशिक आणि तळोजा (जि.नंदुरबार) येथे काम केले आहे.

Sanjeev Jaiswal
Maharashtra Politics : कोल्हापूरची जागा कोणाच्या कुंडलीत लवकरच कळेल! भाजपच्या सिंधीयांचा शिंदे सेनेवर निशाणा?

नाशिक जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी, उप मुख्‍यमंत्री यांच्‍या कार्यालयात उप सचिव, चंद्रपूर आणि औरंगाबादचे जिल्‍हाधिकारी, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्‍त, औरंगाबादचे विभागीय आयुक्‍त, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्‍त, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केले आहे. जयस्‍वाल यांनी विविध ठिकाणी केलेल्‍या विशेष कार्यांबद्दल त्‍यांना विविध सन्‍मान आणि पारितोषिके प्राप्‍त झाली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.