Satpati Dock: सातपाटी बंदराचा होणार कायापालट; जगाला हेवा वाटणारी उभी राहणार वास्तू

Satpati Dock
Satpati Docksakal
Updated on

Satpati Dock: पालघर जिल्ह्यात विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला असून शेकडो वर्षांपासून मच्छीमार बांधव मोठ्या प्रमाणात मासेमारी करतात. पालघर-सातपाटी येथे मच्छीमारांना व्यवसायासाठी सुविधा निर्माण व्हाव्यात, या हेतूने मत्स्य बंदर उभारण्यात येणार आहे. या कामासाठी ३५४ कोटींचा प्रस्ताव महाराष्ट्र सागरी महामंडळाने सरकारकडे सादर केला आहे.

पालघर-सातपाटी येथे ३५० ते ४०० बोटी मासेमारी करतात. त्यामुळे येथील नागरिकांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध होते, मात्र अद्यापही सुविधा अपुऱ्या स्वरूपात आहेत. स्थानिक मच्छीमारांना मासेमारी बोटी नांगरणे, माशांची खरेदी-विक्री, तसेच साठवणूक आदी सुविधा बंदर उभारणीनंतर मिळतील. (Satpati Dock)

Satpati Dock
सातपाटी बंदरासाठी सुधारित अंदाजपत्रक

सातपाटी-मुरबे खाडीला खडक असल्याने येथील बोटीने शिरगाव मार्गे वळसा घालून यावे लागते. तसेच वाळूच्या गाळाचा सामना करावा लागतो. या अडचणी मच्छीमारांना त्रासदायक ठरतात.

त्यामुळे २०० मीटर लांबीची जेटी उभारण्यात येणार आहे. दक्षिणेला एक हजार मीटर लांबीचा व उत्तरेला ५९७ मीटर लांबीच्या बॅकवॉटर बंधारा उभारण्यात येणार आहे. धूप प्रतिबंधक बंधारा असलेल्या पूर्वेच्या बाजूला दळणवळण सुलभ होण्यासाठी ९०० मीटल लांबीचा रस्ता, दोन हजार ४०० चौरस मीटर पार्किंग सुविधा प्रस्तावित करण्यात आली आहे.(latest Navi mumbai News)

Satpati Dock
यंदा ‘दगडूशेठ’ विसर्जन मिरवणुकीत पहिल्याच दिवशी सहभागी होणार ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांची पत्रकार परिषदेत माहिती

या सुविधा मिळणार

पालघर-सातपाटी बंदरामुळे स्थानिक मच्छीमारांना मासेमारी बोटी सुरक्षित ठेवता येण्यास मदत होणार आहे. तसेच समुद्रातून येणाऱ्या माशांची वाहतूक सुलभ होईल, तसेच मासळी खरेदी-विक्रीची प्रक्रिया, मासे साठवणूक, बोटींच्या दुरुस्तीसाठी सुविधा मिळणार आहेत. सागरी महामंडळाने सुधारित प्रस्ताव सरकारकडे पाठवला असून त्याला हिरवा कंदील मिळाल्यावर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले.

बंदराच्या कामाचे स्वरूप

काम जागा (चौरस मीटर)

बोट दुरुस्ती, मासे हाताळणीसह लिलाव व साठवणुकीसाठी जाळी विणणे, गिअर शेड ७५००

प्रशासकीय इमारत, विश्रांतीगृह, बोट दुरुस्ती शेड, रेडिओ कम्युनिकेशन केंद्र, स्वच्छतागृह ९००

डांबरी रस्ते ६०००

काँक्रिटीकरण २३ हजार

डब्लूबीएम २ हजार

संरक्षण भिंत ४५० मीटर

Satpati Dock
Manik Bhide Death : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका माणिक भिडे यांचे निधन

सातपाटी बंदर उभारणीसाठी सर्व परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. आता सुधारित निधी प्रस्ताव सादर केला आहे. प्रशासकीय मान्यता मिळाल्यावर निविदा प्रक्रिया जाहीर करण्यात येईल.

- डॉ. माणिक गुरसळ,

मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड

Satpati Dock
Pune News : जखमी बिबट्याची शोध मोहीम फत्ते: जखमी बिबट्या माणिक डोह येथील निवारा केंद्रात उपचारासाठी दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.