एक हजार तरुणांना राजकीय पटलावर आणणार - सत्यजित तांबे

एक हजार तरुणांना राजकीय पटलावर आणणार - सत्यजित तांबे
Updated on

मुंबई : राज्यातील तरुणांना राजकीय पटलावर (Political Stand) आणण्यासाठी आणि काँग्रेसकडून (National Congress party) सुपर वन थाऊजंड हा कार्यक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून तरुणांना समोर आणले जाणार असून हेच तरुण भविष्यातील काँग्रेसचे तरुण आमदार,खासदार असतील, आणि त्यातूनच काँग्रेसला तरुण नेतृत्वासाठी फायदा होणार (congress young generation) असल्याचे मत राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी आज मुंबई सकाळच्या 'कॉफी सकाळ' मध्ये (Coffee With Sakal) बोलताना व्यक्त केले. (Satyajeet Tambe 1000 youngsters represent Super One Thousand National Congress Party )

एक हजार तरुणांना राजकीय पटलावर आणणार - सत्यजित तांबे
राजकारणात नंबर गेम महत्त्वाचा असतो - सत्यजित तांबे

राज्यात तरुणांना संधी देण्यासाठी आणि पक्ष बांधणीसाठी करण्यात येत असलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती तांबे यांनी यावेळी दिली. सुपर वन थाऊजंड या कार्यक्रमातून आम्ही राज्यात एक हजार तरुणांना राजकीय पटलावर उभे करणार आहोत. त्यांना राजकीय क्षेत्रात उभे राहण्यासाठी आम्ही त्यासाठीचे प्रशिक्षण, सर्व मार्गदर्शन देतोय. आपल्या मतदार संघात विविध प्रकारच्या विकासाचा निधी कसा खर्च करायचा, याची माहिती देतोय या तरुणांमधून उद्याच्या काळात जे निवडून येतील त्यातील पुढे आमदार खासदार

होतील, त्यामुळे पुढे संघटना बांधणीचा फायदा मोठा तरुण नेतृत्वासाठी होणार असल्याचे तांबे यांनी सांगितले.आगामी निवडणुकांमध्ये एमएमआर क्षेत्रात सर्व जिल्हा परिसरात सक्षमपणे तरुण चेहरे आम्ही मैदानात उतरवणार आहोत. ते उतरवताना आम्ही सर्व तयारी करणार आहोत. त्यात कोकणात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे, त्याचा लाभ आम्हाला घ्यायचा आहे. कोकणात आम्ही चेहरा देऊ शकलो नाही, अनेक लोक आमच्यातील लोक दुसरीकडे गेले. ही मोठी पोकळी आम्हाला आता भरून काढायची आहे, असेही तांबे यांनी सांगितले.

एक हजार तरुणांना राजकीय पटलावर आणणार - सत्यजित तांबे
म्हाडा रहिवाशांना मोठा दिलासा! सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

राज्यातील तरुण बेरोजगारांना बेरोजगार भत्ता मिळत नाही, यावर विचारले असता तांबे म्हणाले की, राज्यात आर्थिक अडचण असली तरी बेरोजगारांना बेकार भता मिळाला पाहिजे. कोरोना आणि निर्माण झालेल्या या काळात अनेक तरुण, बेरोजगार हे वैफल्यात जातात. त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला पाहिजे, अशी भूमिकाही तांबे यांनी यावेळी व्यक्त केली.कोरोनाकाळात तरुणांना, छोट्या उद्योजकांना मदत करण्यासाठी केंद्राची मोठी भूमिका होती. पण ती त्यांनी पार पाडली नाही.आता केंद्राने कर्ज द्यायची घोषणा केली पण यापूर्वी जाहीर केलेले मुद्रा लोन किती लोकांना मिळाले, असा सवाल करत तांबे यांनी केंद्राच्या विविध घोषणा कशा तरुणांना फसवणाऱ्या ठरल्या असे सांगत केंद्रावर जोरदार टीका केली.

महाविद्यालयीन निवडणुका या राज्याच्या तरुण नेतृत्वासाठी खूप महत्त्वाच्या असतात, याच निवडणुकांमधून नवे राजकीय नेतृत्व निर्माण होते, त्यामुळे या निवडणुका चालू झाल्या पाहिजे अशी भूमिकाही यावेळी त्यांनी व्यक्त केली. मुंबईत आम्ही आरेचे स्टॉल पुन्हा सुरू करून तरुणांना देणार आहोत. एमआयडीसी मध्ये आम्ही लक्ष घालून तरुणांना उद्योग मिळवून देणार आहेत. शिवाय एमएसएसआयडीसी हिला जिवंत करण्यासाठी आणि त्यातून छोटे उद्योग सुरू करण्यासाठी आम्ही चालना देणार आहोत. मात्र सध्या यात सर्वात मोठीं अडचण पैसा आहे. सरकार सध्या आर्थिक विषयावर बॅक फूट वर आलेले आहे, पण परिस्थिती सुधारल्यास त्यातून तरुणांना आम्ही रोजगार मिळवून देणार असल्याचा विश्वास सत्यजित तांबे यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.