राजकारणात नंबर गेम महत्त्वाचा असतो - सत्यजित तांबे
मुंबई : राजकारणात तरुणांना संधी मिळत असली तरी सत्तेत तरुण वाटेकरी कमी आहेत. कारण राजकारणात 'नंबर गेम' (Politics Number Game) महत्वाचा आहे. तरुण राजकारणात पुढे ( Young generation Politics) येत आहेत. तरुण नेतृत्व देखील करू शकतात. पण त्यासाठी 'नंबर' म्हणजेच इतर लोकांचा पाठिंबा (People Support) हवा असतो. पण हा 'नंबर' मिळवण्यात आम्ही तरुण काहीसे मागे पडतो अशी भावना महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी आज मुंबई सकाळच्या 'कॉफी विथ सकाळ' मध्ये बोलताना व्यक्त केली. ( Satyajeet Tambe Coffee With Sakal says Politics is about Number game)
राज्यातील महाविकास आघाडी सरकार, केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील राजकारणातील तरुणांचे स्थान,स्वबळाचा नारा,राज्यातील आणि देशातील राजकारणात त्यांनी दिलखुलासपणे आपली मते मांडली. मागील काळात देशभरात अनेक तरुण नेत्यांनी काँग्रेस सोडली, त्यावर विचारले असता तांबे म्हणाले की, काँग्रेस हा लोकशाहीला मानणारा आणि त्या विचारावर चालणारा पक्ष आहे. मात्र अलीकडे देशात काही तरुण नेते राजकीय परिस्थितीनुसार काँग्रेस मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतात, ज्योतिरादित्य शिदे यांनी काँग्रेस सोडून गेल्याने काँग्रेसमध्ये असलेल्या तरुणांबाबत प्रश्न उपस्थित होतात. पण असंख्य तरुण हे आज काँग्रेस मध्ये निष्ठेने काम करत आहेत. अनेक तरुण नव्याने आपली भूमिका बजावत असल्याचे तांबे यांनी सांगितले.
याचदरम्यान सचिन पायलट यांनीही काँग्रेस सोडली. पायलट यांना मुख्यमंत्री करायला हवे असे अनेकांना वाटले, परंतु तिथल्या आमदारांना काय वाटतं हे महत्त्वाचे होते. पायलट यांना वयाच्या 32 वर्षांपासून काँग्रेसने खूप काही दिले अनेक पदे दिली. परंतु, राजकीय लाभासाठी ते पक्ष सोडून गेले असल्याचेही तांबे म्हणाले.
काँगेस हा लोकशाही मानणारा पक्ष आहे, त्यामुळे कोणताही निर्णय घेताना खालच्या स्तरापासून विचार, मत घेतले जाते. भाजपचे तसे नाही. राजस्थानमध्ये मनोहरलाल खट्टर यांच्या बाजूने लोक नसताना आणि आपल्याकडे खडसे आदी नेते असताना भाजपने तेव्हा फडणवीस यांना मुख्यमंत्री केले. फडणवीस हे मुख्यमंत्री होतील असे कोणालाही वाटले नव्हते. त्यामुळे भाजप डावपेच यावर पुढे असते, पण काँग्रेस त्या मानाने कमी पडते. कारण काँग्रेस हा लोकशाही मानतो. त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रत्येकाची मते घेऊन तसे निर्णय होतात, असेही तांबे म्हणाले.
काँग्रेसमध्ये विचारला खूप महत्त्व आहे, भाजपचे तसे नाही, भाजपने पश्चिम बंगाल मध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत इतर पक्षाचे दीडशे लोक उचलून आणले आणि त्यांनी नंबर गेम करण्याचा प्रयत्न केला असल्याची आठवणही तांबे यानी यावेळी करून देत भाजपच्या मतलबी राजकारणावर टीका केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.