Sayaji Shinde NCP: "मी अनेक नेत्यांच्या भूमिका केल्या पण..."; राष्ट्रवादीत प्रवेशानंतर सयाजी शिंदेंनी मांडली भूमिका

प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
Sayaji Shinde Joins Ajit Pawar NCP
Sayaji Shinde Joins Ajit Pawar NCP
Updated on

मुंबई : प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी आपण राजकारणात का आलो? याचं कारण सांगितलं. तसंच अभिनेता म्हणून आपण आजवर नेत्यांच्या अनेक भूमिका साकारल्याचं त्यांनी सांगितलं.

Sayaji Shinde Joins Ajit Pawar NCP
Air India Flight: हवेत असतानाच एअर इंडियाच्या विमानाचा लँडिंग गिअर अडकला! 140 प्रवाशांसह दोन तासांनी सुरक्षित लँडिंग

पक्ष प्रवेशानंतर पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडताना अभिनेत्यावरुन आता नेते बनलेले सयाजी शिंदे म्हणाले, अजून मी नेता पुढारी झालो नाही त्यामुळं मला प्रोटोकॅाल माहिती नाही. मी अनेक नेत्यांच्या भूमिका केल्या आहेत. पण राजकारणात येईल असा कधी विचार केला नव्हता. मंत्रालयात मी २५ वेळा गेलो तर १५ वेळा दादांनाच भेटलोय. मागच्या ८ दिवसांत माझा राष्ट्रवादीत प्रवेशाबबात निर्णय झाला.

Sayaji Shinde Joins Ajit Pawar NCP
Pune Rain: अचानक आलेल्या पावसानं पुण्याला झोडपलं! दसऱ्याच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या पुणेकरांची त्रेधातिरपीट

काही विषय हे सिस्टममध्ये राहून लवकर मार्गी लावता येतील. सिस्टममधून काम झालं तर मोठ्या संख्येनं झाड लागतील. या पक्षाचं नियोजन आणि काम मला आवडतं. शेतकऱ्यांच्या योजनांसंदर्भात पक्ष चांगला निर्णय घेत, असं मला वाटलं. आता काही हटत नाही जे व्हायचं ते होऊन जाऊ दे. अजितदादांकडून मी राजकारणाचे धडे घेईन. माझ्या डोक्यात जी कामं आहेत ती पुढच्या ५ वर्षात करण्याचा विचार आहे. मला काही हवय असं नाही, माझ्याकडं सगळं आहे. पण मला पर्यावरणासंदर्भात काम करायचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.