सकाळ इम्पॅक्ट : 'तो' आदेश तातडीने रद्द करा, बच्चू कडू म्हणाले...

शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले आदेश
bacchu-kadu
bacchu-kadusakal media
Updated on

मुंबई : शाळांच्या विरोधात (School) तक्रार करण्यासाठी पालकांना (parents) शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर (Stamp paper) अर्ज करण्याची सक्ती करणारा शालेय शिक्षण विभागाचा तो तुघलकी निर्णय रद्द होणार आहे. यासाठी शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी शालेय शिक्षण सचिव वंदना कृष्णा (vandana krishna) यांना तो आदेश तातडीने रद्द करणण्याचे निर्देश दिले. ( School minister Bacchu kadu orders to secretary vandana krishna to cancel stamp paper letter-nss91)

राज्यमंत्र्यांनी दिलेल्या या आदेशामुळे राज्यातील लाखो पालकांना शिक्षण सचिवांच्या तुघलकी निर्णयापासून मोठा दिलासा मिळणार असल्याने याविषयी पालक संघटनांच्या प्रतिनिधींनी समाधान व्यक्त करण्यात आले. पालकांना आपली तक्रार नोंदविण्यासाठी 100 रूपयांच्या स्टँप पेपवर अर्ज करावा लागणार, असून त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने तुघलकी निर्णय काढला असल्याचे वृत्त 'सकाळ'मध्ये 25 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते, त्याचे राज्यभरातील पालकांमध्ये तीव्र पडसाद उमटले होते. त्या पार्श्वभूमीवर पालक संघटनांच्या प्रतिनिधींनी राज्यमंत्री कडून यांच्यासमोर याविषयीची माहिती देत तो निर्णय रद्द करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची आज मागणी लावून धरली होती.

bacchu-kadu
धारावीत महापालिकेची विशेष लसीकरण मोहिम, 'हा' आहे BMC चा टार्गेट

शालेय शिक्षण सहसचिव इम्तियाज काझी यांच्या उपस्थिती आज मंत्रालयात पालक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. मात्र त्या बैठकीला शिक्षण विभागातील उच्चस्तरीय अधिकारी आणि स्वत: शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड याही उपस्थित नसल्याने पालक संघटनांचे समाधान झाले नव्हते. त्यामुळे त्यांनी थेट मंत्रालयात शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट घेतली. त्यावेळी कडून यांनी पालकांच्या अनेक मागण्या आणि त्यांच्या अडचणींवर सविस्तर चर्चा करून त्यांना समाधान होईल असे आश्वासन दिले. त्याच दरम्यान संघटनांच्या प्रतिनिधींनी शिक्षण सचिवांनी काढलेल्या तुघलकी फर्मानाची माहिती दिली त्यावर राज्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेत हा निर्णय रद्द करण्याचे आदेश दिले.

दरम्यान, पालकांच्या विरोधात निर्णय घेणाऱ्या शिक्षण सचिवांना तात्काळ हटवून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पॅरेंट असोसिएशन पुणे, ऑल इंडिया पेरेंट असोसिएशन, महापेरेंट असोसिएशन, नाशिक पेरेंट असोसिएशन, आप पालक युनियन आदी पालक संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळी केली. यासाठीचे एक निवेदन यावेळी शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना दिले असल्याचे पालक संघटनांचे प्रतिनिधी प्रसाद तुळसकर, जयश्री देशपांडे, डॉ. प्रशांत खांडे, दत्ता पवार, निलेश साळुंखे, प्रदीप यादव, हरीष वाघ, मुकुंद किर्दत आदी संघटनांच्या प्रतिनिधींकडून सांगण्यात आले.

काय होता हा तुघलकी आदेश

25 टक्के पालकांकडून 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर स्वतंत्र अर्ज प्राप्त करून घ्यावे व त्यानंतर सदर प्रकरण संबंधित विभागीय शुल्क निर्धारण समितीकडे सुनावणीसाठी पाठवावे असे आदेशा शालेय शिक्षण सचिव वंदना कृष्णा यांनी मागील आठवण्यात काढले होते. त्यावर पालक संघटनांच्या प्रतिनिधींनी तीव्र आक्षेप नोंदवले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()