शाळा सुरू होण्यापूर्वी मुंबईतील शिक्षक पुन्हा निवडणूक ड्युटीवर

School
SchoolGallery
Updated on

मुंबई : दीड वर्षांनंतर आणि राज्यासह मुंबई आणि परिसरातील शाळा सुरू (school starts) होणार असल्याने त्यासाठी उत्साहाचे वातावरण शिक्षक (teachers) आणि शिक्षकेतरांत निर्माण झाले आहे. मात्र या उत्साहावर आता निवडणूक आयोगाच्या (election commission) नवीन ड्युटीमुळे (new duty) विरजन पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

School
इतर राज्यांतून आणि परदेशातून मुंबईत येणारे सरासरी 19 नागरिक कोरोना संक्रमित

मुंबई आणि परिसरातील अनेक शिक्षकांना स्थानिक प्रशासकनाकडून निवडणूक कामकाजासाठी ड्युट्या बजावण्यात आल्या असून त्यांना शाळांऐवजी आता या कामकाजावर जावे लागणार असल्याने यासाठी अनेक शिक्षकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. शिक्षण हक्क कायद्यातील तरतूदीनुसार शिक्षकांना प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी निवडणूक कामाला लावू शकतात. त्यासाठी कायद्यात तरतूदच आहे. गेल्या दोन वर्षांपासून शहरातील अतिरिक्त शिक्षक देण्यात आले आहे. या शिक्षकांना बीएलओ या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. नुकतीच १६६ अंधेरी पूर्व येथील विधानसभा मतदार संघात काम करणाऱ्या ५० हून अधिक शिक्षकांनी वर्सोवा आणि अंधेरी पश्चिम येथे बदली करण्यात आली आहे. हे शिक्षक निवडणूक आयोगाचे कायमस्वरुपी कर्मचारी नसून त्यांची अशी बदली करणे चुकीचे शिक्षक संघटनांकडून सांगण्यात आले.

मुंबईतील अतिरिक्त शिक्षक २०१९ पासून रोज बीएलओ ड्युटी करत असून त्यांना शिक्षक म्हणून असलेल्या हक्काच्या रजा, प्रवास भत्ता, कोणत्याही सुविधा नसताना. करोनाकाळात ही काम सुरू होती. त्यावेळी अत्यंत मेहनतीने या शिक्षकांनी कामे पूर्ण केल्यानंतर मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी या शिक्षकांची बदली दुसऱ्या वॉर्डमध्ये केल्याचे शिक्षक परिषदेचे मुंबई विभागाचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.