ठाणे शहरातील 'ब्लॅक स्पॉट'चा घेणार शोध, अपघात रोखण्यासाठी वाहतूक शाखेचा पुढाकार

Accidental Black Spot in Thane
Accidental Black Spot in Thane
Updated on

ठाणे : वाढती लोकसंख्या आणि वाहनांच्या वाढत्या संख्येबरोबरच अपघातांचे प्रमाणदेखील वाढत आहे. त्यामुळे राज्य महामार्गावरील "ब्लॅक स्पॉट' शोधून त्यावर उपाययोजना करण्यात येते. त्यानुसार ठाणे पोलिस आयुक्तालय हद्दीतील अपघातांचे "ब्लॅक स्पॉट' शोधून वाहतुकीचेही नियोजन करणार असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे नवनियुक्त पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.

ठाणे शहर वाहतूक नियंत्रण उपायुक्त अमित काळे यांची मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयात बदली झाली. त्यांच्या जागी बाळासाहेब पाटील यांची नियुक्ती झाली असून त्यांनी या पदाचा कार्यभार नुकताच स्वीकारला. या वेळी संवाद साधताना त्यांनी वरील माहिती दिली. ठाणे शहराच्या नागरीकरणाबरोबर वाहनांच्या संख्येतदेखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. परिणामी रस्ते अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. यावर उपाययोजना म्हणून ठाणे शहर वाहतूक नियंत्रण आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या क्षेत्रातील ब्लॅक स्पॉट शोधून काढण्यात येणार आहेत.

शहरातील 500 मीटरच्या परिसरात मागील तीन वर्षात 5 पेक्षा अधिक अपघात झालेले, त्यात मृत अथवा गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्या असतील किंवा 10 व त्यापेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्यू झाले असले, अशी ठिकाणे "ब्लॅक स्पॉट'मध्ये मोडतात. अशा ठिकाणांचा शोध घेऊन यादी तयार करण्यात येणार असून तेथील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी काय काय उपाययोजन करता येतील, त्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात मेट्रो प्रकल्पांचे काम सुरू आहे. यामुळे रस्त्यांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येसह वाहतूक सुरळीत ठेवण्यावर विशेष लक्ष केंद्रित करणार आहे. मेट्रोने दिलेल्या वाहतूक मदतनिसांची वाहतूककोंडी सोडवताना मोठी मदत होते. अशा वॉर्डनची मेट्रोकडे मागणी करून पालिकेने दिलेल्या वॉर्डनच्याही मानधनाचा प्रश्न सोडवून त्यांची संख्या वाढविणार असल्याची माहिती उपायुक्त कोपरी पूल, शिळ डायघर, कल्याणचा दुर्गाडी पूल येथील कोंडी फोडून वाहतूक सुरळीत करण्यावर भर देण्यात येणार आहे.

शहरात अनेक भागांमध्ये रस्तेदुरुस्तीची कामे सुरू आहेत. सर्व यंत्रणांशी समन्वय साधून रस्तेदुरुस्तीसाठी पाठपुरावा करणार असून त्याद्वारेही वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी मदत होणार आहे. शहरात अनेक सेवा रस्त्यांवर दुतर्फा वाहने उभी असतात. त्याऐवजी ती एकाच बाजूला पार्किंग करण्याचे नियोजन आहे.
- बाळासाहेब पाटील,पोलिस उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा

----------------------------
(संपादन : प्रणीत पवार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.