पनवेल : कारवाईनंतर सेल्फी, फोटोच्या नादात आरोपी पसार

अवैध नीरा विक्रेत्यांवर सुरू होती कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभाग पनवेलची कारवाई
Selfie after the action the accused ran
Selfie after the action the accused ransakal
Updated on

मुंबई : विना परवाना नीरा विकणाऱ्यांवर शुक्रवारी सकाळी 12 वाजताच्या दरम्यान सायन-पनवेल महामार्गावर पनवेल येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई सुरू होती. विना परवाना नीरा विकत असल्याने उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी विक्रेत्यांचा मुद्देमाल जप्त करून सेल्फी आणि फोटो काढत असतांना आरोपी सोबत सुरू असलेल्या चर्चेचा फायदा घेत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांदेखत आरोपीने पळ काढला.

सायन-पनवेल महामार्गावर जागोजागी नीरा विक्रेत्यांनी अवैध पद्धतीने आपली दुकानदारी थाटली आहे. बऱ्याच वेळा नीरा पिण्यासाठी वाहतूकदार महामार्गावर आपली बेकायदा वाहन उभी करून नीराचा घोट घेतात. त्यामुळे अपघातांची शक्यता आहे. तर यामध्ये विना परवाना नीरा विक्री केल्या जात असल्याचे उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, अशा कारवाई सुरूच राहतात, तर पळ काढलेल्या आरोपिलाही काहीवेळानंतर पकडण्यात आल्याचा दावा पनवेल राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक पुरळकर यांनी केला आहे.(department said that Nira was being sold without a license)

Selfie after the action the accused ran
नेवरीजवळ दोन मोटारीच्या धडकेत तिघे ठार

यादरम्यान घटनास्थळी सापडलेला मुद्देमाल जप्त केला असून, नीरा नामक द्रवाची जाग्यावरच विल्हेवाट करण्यात आली. तर कारवाईसाठी एका बाटलीत निरा द्रव घेण्यात आले असून, प्रकरणातील आरोपीला न्यायालयात हजर करणार असल्याचे पुरळकर यांनी सांगितले. मात्र, हातात असलेल्या आरोपीने तात्पुरते का होईना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन पळ काढण्याने त्यांची चांगलीच धावपळ झाली.

नीरा म्हणजे ताडी प्रकार आहे. हे विकण्यासाठी परवाना लागतो, मात्र त्यांच्याकडे परवाना नव्हता अवैध पद्धतीने भेसळ करून नीरा च्या नावावर विकत होते. त्यामुळे कारवाई केली आहे. तर पसार झालेल्या एका आरोपीला पकडण्यात आले आहे.

- संजय पुरळकर, पोलीस निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग पनवेल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()