कोरोनानंतर शारीरिक आजाराने त्रस्त असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकानं पिस्तूलातून स्वतःवर झाडली गोळी; प्रकृती चिंताजनक

कॅम्प नंबर 4 परिसरात 60 वर्षीय जगदीश चव्हाण हे आपल्या कुटुंबासोबत राहतात.
Ulhasnagar Vitthalwadi Police
Ulhasnagar Vitthalwadi Policeesakal
Updated on
Summary

सकाळी घरात कोणी नसताना चव्हाण यांनी त्यांच्या जवळील एका पिस्तूल मधून छाती आणि पोटाच्या मध्यभागी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला.

उल्हासनगर : कोरोना (Coronavirus) काळानंतर शारीरिक आजाराने त्रस्त असणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाने अवैध पिस्तूल मधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज सकाळी उल्हासनगरात (Ulhasnagar) घडली आहे.

कॅम्प नंबर 4 परिसरात 60 वर्षीय जगदीश चव्हाण हे आपल्या कुटुंबासोबत राहतात. त्यांच्या दोन्ही मुलांचा बाटली बंद पाणी विक्रीचा व्यवसाय आहे. कोरोना काळानंतर चव्हाण हे शारीरिक आजाराने त्रस्त होते. शनिवारी सकाळी घरात कोणी नसताना चव्हाण यांनी त्यांच्या जवळील एका पिस्तूल मधून छाती आणि पोटाच्या मध्यभागी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला.

Ulhasnagar Vitthalwadi Police
मोठी बातमी! शिक्षणात मराठा आरक्षण नसल्यामुळं 18 वर्षाच्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल; विहिरीत उडी घेऊन संपवलं जीवन

यानंतर त्यांच्या कुटुंबाने त्यांना उपचारासाठी एका खासगी रूग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने पुढे त्यांना मुंबईत हलवण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. जगदीश चव्हाण यांनी नेमक्या कोणत्या कारणास्तव आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला? हे अद्याप कळू शकले नसल्याचे सहाय्यक पोलिस आयुक्त अमोल कोळी यांनी सांगितले.

तर, ज्या पिस्तूल मधून त्यांनी स्वतःवर गोळी झाडली, त्याबाबतचे कुठलेही पुरावे पोलिसांकडे सादर केलेले नसल्याने ते अवैधरित्या शस्त्र बाळगत असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास विठ्ठलवाडी पोलीस (Vitthalwadi Police) करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.