'आता भाजपाच्या रडारवर मिलिंद नार्वेकर'

"लॉकडाऊनच्या काळात मुख्यमंत्र्यांचा डावा हात मिलिंद नार्वेकर बंगला बांधत होता."
'आता भाजपाच्या रडारवर मिलिंद नार्वेकर'
Updated on

मुंबई: "लॉकडाऊनच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उजवा हात अनिल परब (anil parab) रिसॉर्ट बांधत होता, तर डावा हात मिलिंद नार्वेकर (milind narvekar) बंगला बांधत होता. मिलिंद नार्वेकर यांनी साडेचारशे झाडं कापून बंगला उभारायचं काम सुरू केलं" असा आरोप भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (kirit sommaya) यांनी केला आहे. मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक तर अनिल परब परिवहन मंत्रीपदावर आहेत. (Serious allegation on milind narvekar by kirit sommaya)

"दोघांनी कुठल्याही प्राधिकरणाची परवानगी न घेता हे बांधकाम केलं" असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. "अनिल परब यांच्या बंगल्यावर नार्वेकर जातात आणि नार्वेकरांच्या बंगल्यावर अनिल परब जातात आणि या दोघांची काळजी घेण्याचं काम उद्धव ठाकरे करतात" असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

'आता भाजपाच्या रडारवर मिलिंद नार्वेकर'
परांजपे बिल्डर्सना अटक केलेली नाही- मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण

"दापोली-मुरुड येथे अनिल परब आणि अलिबाग-मुरुड येथे रविंद्र वायकरांचे बंगले आहेत" असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. "शिवसेना बंगलो सेना झाली असून या सगळ्यांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे" अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली. "अनिल देशमुख हे छगन भुजबळांच्या मार्गावर जात आहेत. त्यांनी वाझेंकडून मिळवलेला पैसा कलकत्त्याच्या कंपनीत वळवला. काळ्या पैशामुळे अनिल देशमुख कधी जेलमध्ये जाणार याची उत्सुकता जनतेला आहे" असे सोमय्या म्हणाले.

'आता भाजपाच्या रडारवर मिलिंद नार्वेकर'
अनिल देशमुखांना अटक होणार? 'ईडी'चे मुंबईच्या घरातही छापे

"अनिल देशमुख नंतर अनिल परबचा नंबर आहे. अनिल परब यांच्या आर्थिक व्यवहाराची CBI आणि ED चौकशी करावी यासाठी 800 पानी माहिती मी दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्यामध्ये क्लिन चिट देण्याची हिंमत असेल तर वायकर, नार्वेकर यांच्या बंगल्याला क्लिनचिट द्या" असं आव्हान सोमय्यांनी दिलं. नार्वेकरांबाबत मंत्रालयात जाऊन सचिवांना मी लेखी तक्रार केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.