सिरॉलॉजीक टेस्ट मधून डेल्टा प्लसचे वेगवेगळे व्हेरियंट; आरोग्य यंत्रणा सतर्क

Delta plus virus
Delta plus virussakal media
Updated on

मुंबई : सिरॉलॉजीक टेस्ट (serologic test) मधून डेल्टा प्लसचे (delta plus variant) वेगवेगळे व्हेरियंट समोर आल्याने आरोग्य यंत्रणा (health department) सतर्क झाली आहे. हा व्हेरिएन्ट सतत बदलत (variant) असल्याने समोर आले आहे. मात्र मुंबईत या व्हेरियंटचे फार कमी रुग्ण (Less patient) असल्याने फार चिंता करण्याचे कारण नसल्याचे पालिका मुख्य रुग्णालये (bmc hospital) आणि वैद्यकिय शिक्षण संचालक डॉ. रमेश भारमल (dr. ramesh bharmal) यांनी सांगितले.

कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंट च्या नव्या सापडलेल्या तीन व्हेरियंटच्या तपासणीसाठी मॉलिक्युलर मॅपिंग करण्यात येते. त्यानंतर जिनोम सिक्वेन्सिगमधून मॅपिंग मध्ये अँटीजेन बदलले की नवीन व्हेरियंट समोर येतात. यात जर लक्षणामध्ये बदल दिसून आला तर अडचणी निर्माण होऊ शकतात. मात्र सध्या याचा अभ्यास सुरू असल्याने लक्षणांमधील बदलाबद्दल ठोस सांगणे शक्य नसल्याचे डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.

Delta plus virus
15 टक्के शुल्क कपातीचा जीआर सरकारच्याही अंगलट ?

सध्या राज्यात दैनंदिन कोरोना बाधितांची संख्या ही 6 हजार तर मुंबईत 200 च्या जवळपास येत आहे. दुसऱ्या लाटेच्या तुलनेत ही आकडेवारी खूपच कमी आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचे दिसते. मात्र, असे असले तरी कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. त्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या तीन वेगवेगळ्या विषाणूंनी त्यात आणखी भर घातली आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटचे नवे रूप जीनोम सिक्वेंसींगमध्ये अँटिजेन वेगळे आल्याने तीन नवे व्हेरियंट समोर आले आहेत. या नव्या व्हेरिएन्ट चे नेमके स्वरूप कसे आहे यासंदर्भात अभ्यास सुरू आहे. जीनोम सिक्वेंसींगमध्ये राज्यात 77 तर मुंबईत 11 डेल्टा प्लस रुग्ण असल्याचे आढळून आले आहेत. डेल्टा प्लस व्हेरिएंट ग्रुपचे Ay.1, Ay.2 आणि Ay.3 तीन वेगवेगळे प्रकार आहेत. डेल्टा प्लस विषाणूचे आणखी 13 उप-वंश असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मात्र जिनोम सिक्वेन्सिगमधून मॅपिंग केलेले असून अँटीजेन बदलले की हे व्हेरियंट बदलत असल्याचे समोर येत आहे.डेल्टा व्हेरिएंटमध्ये म्युटेशन झाल्यावर डेल्टा प्लस व्हेरिएंट तयार होतो. मुंबईत डेल्टा प्लस व्हेरियंटचे जास्त रुग्ण सापडले नसून लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने धोका कमी आहे. मात्र नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे डॉ. भारमल म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()