भिवंडी : घरफोडी व वाहन चोरीच्या गुन्ह्यांची उकल; ७ जणांना अटक

bike robbery
bike robberysakal
Updated on

भिवंडी : शहरात वाढणाऱ्या घरफोड्या आणि वाहनचोरी (vehicle robbery) रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यासाठी पोलिस उपायुक्त यांनी त्यांच्या आदेशानुसार शांतिनगर पोलिस ठाण्याचे (Shanti nagar police station) वरिष्ठ पोलिस निरीक्षक शीतल राऊत यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाने शहरात घडलेल्या घरफोडी व वाहन चोरीचे ९ गुन्हे उघडकीस आणले आहेत. यामध्ये सात आरोपींना पोलिसांनी अटक केली असून (seven culprit arrested) त्यांच्याकडून ३ लाख ९८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल तसेच वाहन चोरीतील एक लाख ८५ हजार रुपये किमतीची वाहने असा एकूण पाच लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त (robbed property seized) केला आहे.

bike robbery
मुंबईकरांना दिलासा; जंबो कोविड केंद्र झाली रिक्त, केवळ 200 रुग्ण दाखल

शांतिनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ११० ग्रॅम वजनाचे तीन लाख ३० हजार रुपये किमतीचे दागिने, एक रिक्षा, तीन मोटरसायकल, १५०० रुपये किमतीचे पितळी रॉड, तर १७ हजार रुपये किमतीचे ट्रॅक पँटचे अशा सात चोरीचे गुन्हे, तर भिवंडी शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक रिक्षा व एक मोटरसायकल अशा दोन गुन्ह्यांचे उकल शहर व शांतिनगर पोलिसांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.