Dombivali Crime : 7 लाखाचे एमडी कल्याणमध्ये सापडले; चार जणांना अटक

अंमली पदार्थ विरोधी कल्याण परिसरात अंमली पदार्थांचा वापर वाढला असून गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढत आहे.
Crime
CrimeSakal
Updated on

डोंबिवली - अंमली पदार्थ विरोधी कल्याण परिसरात अंमली पदार्थांचा वापर वाढला असून गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढत आहे. या विरोधात कोळसेवाडी आणि खडकपाडा पोलिसांनी कारवाई करत एकाच दिवशी कारवाई करत 7 लाख 15 हजारचा अंमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी 4 जणांना पोलिसांनी अटक केली असून यात नायजेरियन व्यक्तीसह इराणी महिलेचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतिल 100 फूटी रोडवर नाकाबंदी दरम्यान एक रिक्षा पोलिसांना पाहून पळवली जात होती. रिक्षाची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी रिक्षाचा पाठलाग करत रिक्षातील दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे 5.6 ग्राम वजनाचा 33 हजार 600 रुपये किंमतीचा अंमली पदार्थ (एमडी) सापडला.

या दोघांना अटक करत चौकशी केली असता त्यांनी नवी मुंबईतील चुकवू इमेका जोसेफ इमेका या 42 वर्षीय व्यक्तीकडून हा अमली पदार्थ खरेदी केला असल्याचे सांगितले. तसेच कल्याण पूर्वेत त्याची विक्री करणार असल्याचे देखील सांगितले.

या माहितीच्या आधारे कोळसेवाडी पोलिसांनी नवी मुंबईतील वाशी परिसरातून सदर नायजेरियन व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याच्याकडील 279 ग्रॅम वजनाचा 5 लाख 58 हजार रुपये किंमतीचे एमडी हस्तगत केले. या तिघांना पोलिसांनी अटक केली.

याच दरम्यान खडकपाडा पोलिसानी आंबिवली परिसरात केलेल्या कारवाईत फिजा इराणी या महिलेकडे 34 ग्रॅम वजनाचे एमडी जप्त केले गेले आहे या अंमली पदार्थांची बाजारातील किमत 68 हजार रुपये इतकी असून या अंमली पदार्थांची एकत्रित रक्कम 7 लाख 15 हजार रुपये इतकी आहे.

कल्याणात प्रथमच इतकी मोठी कारवाई करण्यात आल्याची माहिती कल्याणचे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी दिली आहे. या सर्व प्रकरणाचा पुढील तपास कोळसेवाडी पोलीस करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.