शिवडीतील कंटेनर ओपीडी हिट ; 2 महिन्यात 8000 रुग्णांवर उपचार

patient treatment
patient treatmentsakal media
Updated on

मुंबई : शिवडी पूर्व (sewri east) विभागात कोळीवाडा रोडवर (koliwada road) तब्बल 40 वर्षांनंतर महापालिकेचा (BMC) कंटेनर आरोग्य दवाखाना (container health clinic) उभारण्यात आला आहे. अत्याधुनिक पद्धतीची यंत्रणा (Modern technology) आणि सर्व प्रकारच्या सुविधा (all facilities) असलेला हा दवाखाना जणू शिवडीकरांसाठी वरदान ठरला आहे. दोन महिन्यात तब्बल 8000 रुग्णांनी दवाखान्यात उपचार (patients treatment) घेतले आहेत.

patient treatment
कोविड काळात वाढली चिंता; 25 टक्के मुंबईकर नैराश्यात

शिवडी कोळीवाडा, पूर्वेकडील भागात सुमारे तीन ते साडेतीन हजार लोकवस्ती आहे. मात्र गेल्या 40 वर्षांपासून पालिकेचा दवाखाना आणि आरोग्य केंद्र नव्हते. त्यामुळे तब्बल 2 किलो वर असलेले केईएम रुग्णालय गाठावे लागत होते. तसेच मध्ये असलेल्या रेल्वे पटरीचे गेट ठराविक वेळीच उघडे होत असल्याने अन्य वेळी केईएम रुग्णालय गाठण्यास वळसा घालून जावे लागत होते. शिवडी पूर्व आणि कोळीवाडा परिसरात पालिकेचे आरोग्य केंद्र नव्हते. मात्र लोक तरी मुख्य रुग्णालयात उपचारासाठी जात होते. मात्र कोरोना काळात केईएम सायन सारख्या रुग्णालयात जाण्यास नागरिक घाबरत असल्यामुळे उपचाराअभावी नागरिकांचे खुप हाल झाले. विभागात एखादा चांगला बी.एम.एस.डाॅक्टर नव्हता. त्यामुळे उपचार घ्यायचे कुठे असा प्रश्न निर्माण झाला.

आणि नागरिकांनी शिवडी पूर्व विभागात आरोग्य केंद्र उभारण्यात यावे अशी मागणी पडवळ यांच्याकडे केली. आणि त्यांनी दवाखाण्याचा प्रस्ताव मुंबई पालिकेला दिला. त्यानंतर या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाला. त्यानंतर पालिका अधिकारी वर्ग यांच्यासोबत बैठक झाली. आणि ठिकाणी शिवडी कोळीवाड्यात बाळासाहेब ठाकरे दवाखाना उभारण्यात आला. हा दवाखाना चार कंटेनरमध्ये बांधण्यात आला असून तेथे आधुनिक पद्धतीची यंत्रणा आणि सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहे. कंटेनर मध्ये असला तरी संपूर्ण दवाखाना एसी आहे. या दवाखान्यामुळे नागरिकांची आरोग्य सुविधेसाठी दोन किमी केईएम व शिवडी नाका येथील आरोग्य केंद्रात जाण्यासाठी करावी लागणारी पायपीट थांबली. या दवाखान्याला दोन महिने झाले असून येथे तब्बल 8000 रुग्णांनी येथे उपचार घेतले आहेत.

patient treatment
मुंबई : उपनगरीय मार्गावर येणार 238 एसी लोकल

खर्च वाचवून केला दवाखाना सुरू

या परिसरात पक्के बांधकाम असलेला दवाखाना सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यासाठी इंदिरा नगर परिसरात बीपीटीच्या एका इमारतीत जागा शोधण्यात आली होती. बीपीटीने दर महिना 80 हजार रुपये भाड्याने जागा देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र या जागेची दुरवस्था झाली होती, तसेच तिच्या डागडुजीसाठी लाखो रुपये खर्च अपेक्षित होता. हा खर्च वाचवण्यासाठी कंटेनर दवाखान्याचा पर्याय निवडण्यात आला, अशी माहिती नगरसेवक सचिन पडवळ यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.