शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी 2 नोव्हेंबर रोजी शिवसेनेच्या मुंबादेवी उमेदवार शायना एन सी यांच्या विरोधात केलेल्या 'इम्पोर्टेड माल' वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. त्यांनी सांगितले की, शायना एन सी यांचा अपमान करण्याचा हेतू कधीही नव्हता. मात्र त्यांच्या बोलण्याचा विपर्यास केला गेला आहे. यानंतर आता शायना एन सी यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यात त्यांनी पुन्हा या मुद्द्यावरून टीकास्त्र डागलं आहे. तसेच आता संजय राऊतांनीही माफी मागावी अशी मागणी केली आहे.