Latest Mumbai News: छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही जे औरंगजेब करू शकला नाही, ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर शरद पवार यांनी महाराष्ट्रात केले.
पवार यांनी जातीयवाद, द्वेषाचे राजकारण करून महाराष्ट्रातील एकोपा संपवला, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी (ता. १२) भांडुप येथे उमेदवार शिरीष सावंत यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या जाहीर सभेत केली.
अठरा पगड जाती, समाज एकत्र घेत स्वराज्यासाठी लढा देणारे छत्रपती कुठे आणि जातीयवादी पवार कुठे, असे वक्तव्य ठाकरे यांनी केले. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही आरोप केला. भेट म्हणून देऊ केलेली छत्रपतींची मूर्ती हाती घेण्यास राहुल यांनी नकार दिला. अशा व्यक्तींसोबत फक्त मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे मांडीला मांडी लावून बसतात, अशीही टीका त्यांनी केली.
गेल्या ३० वर्षांत शिवसेनेने मुंबईचा विचका आणि मराठी माणसाला उद्ध्वस्त करण्याचा उद्योग केला. नाणारचा प्रकल्प बारसू येथे हलविण्याचे खटाटोप सुरू आहेत. तेथे पाच हजार एकर जमीन उपलब्ध आहे. ही जमीन आली कुठून, कोणी विकली, कोणी विकत घेतली.
याचा काही थांगपत्ता सरकारला आहे का? असा सवाल उपस्थित करत ठाकरे यांनी अन्य राज्यांचे उदाहरण दिले. गुजरातमध्ये शेतजमीन शेतकरीच विकत घेऊ शकतो आणि त्या जमिनीवर शेतीच करावी लागते. हा नियम आपल्या राज्यात होऊ शकत नाही, असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला.
उद्धव ठाकरे यांची निवडणूक कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या झाडाझडतीचा उल्लेख करत राज म्हणाले, ज्याच्या हातून कधी एक पैसा सुटला नाही, अशा व्यक्तीची झडती काय म्हणून घेता? हातरुमाल आणि कोमट पाण्याव्यतिरिक्त त्यांच्याकडे काही नाही. त्यावर सभेत जोरदार हशा पिकला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.