Sharad Pawar: शरद पवारांचा शिंदेंना धक्का, बंडखोरी करत सहसंपर्कप्रमुखाने हाती घेतली तुतारी

Eknath Shinde Thane: भाजपला गेल्याने सुभाष पवार यांची कोंडी झाली. महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाकडे आहे.
Maharashtra Politics
Sharad pawar eknath shinde sakal
Updated on

Latest Badlapur News: शिवसेना शिंदे गटाचे भिवंडी लोकसभा सहसंपर्कप्रमुख आणि ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे मुरबाड विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्याविरोधात उमेदवारी दिली जाण्याची चर्चा आहे.

पण शरदचंद्र पवार गटाचे बदलापूरचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरेदेखील या मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याने या मतदारसंघात बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Maharashtra Politics
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या कोल्हापूर ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष पदी आदिक जाधव यांची निवड
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.