मुंबई - राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या राजकीय वाटचालीविषयी प्रतिक्रीया दिली होती. त्यावरून कॉंग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. कॉंग्रेसनेत्या यशोमती ठाकूर यांनी पवार यांच्या वक्तव्यावर उघड नाराजी व्यक्त केली होती. आता कॉंग्रेसचे जेष्ट नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब धोरात यांनीदेखील यशोमती ठाकूर यांचं समर्थन केले आहे.
महाविकास आघाडीमधील काही नेत्यांच्या काही मुलाखती/लेख माझ्या निदर्शनास आलेयत. काँग्रेसची कार्याध्यक्षा म्हणून मला आघाडीतील मित्रपक्षांना सांगू इच्छिते की हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल कर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टीप्पणी करणे टाळावं. आघाडी धर्माचं पालन सर्वांनी करावं. असे यशोमती ठाकूर यांनी म्हटले होते. त्यामुळे कॉंग्रेसच्या वतीने स्पष्ट नाराजी दिसून आली होती.
यशोमती यांच्या प्रतिक्रीयेविषयी कॉंग्रसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ' राहुल गांधी यांना पक्षात स्वीकारार्हता असून ते आमचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली देशात काँग्रेस पुन्हा संघटित होत आहे. राहुल गांधी यांनी जीवनात जे दुख पाहिले, त्यांच्यावर जे आघात झाले त्यातूनही उभे राहून ते नेतृत्व करत आहेत. पुढील काळातही ते समर्थपणे नेतृत्व करणार आहेत. ते करत असलेल्या कामाच्या विरोधात भाजपच्या प्रचार यंत्रणा काम करतात, त्याचा परिणाम असतो. राहुल गांधी पुढची वाटचाल यशस्वी करणार आहेत, त्यावर आमचा विश्वास आहे. शरद पवारांचे ज्येष्ठत्व आम्ही मान्य करतो. मात्र, ते राहुल गांधींना समजून घेण्यात कमी पडले असं वाटतं. काँग्रेसजणांना जे वाटले ते त्या बोलल्या आहेत. आमच्या काँग्रेस जणांचे मत यशोमती ठाकूर यांनी मांडले आहे.
काय म्हणाले होते शरद पवार -
एका मुलाखतीत शरद पवार यांना राहुल गांधी यांच्या नेतृत्वाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना पवारांनी राहुल गांधींच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केला होता. 'हे गरजेचं नाही की, सगळ्यांचेच विचार स्वीकारले पाहिजेत. मी देशातील नेतृत्वाविषयी भाष्य करू शकतो, इतर देशातील नाही. सीमांचं पालन केलं गेलं पाहिजे. कोणत्याही पक्षाचे नेतृत्व यावर अवलंबून असतं की, त्यांना पक्षामध्ये कशा पद्धतीने स्वीकारले जात आहे. राहुल गांधी यांच्यामध्ये सातत्याचा अभाव आहे,' असे पवार म्हणाले होते.
Sharad Pawar failed to understand Rahul Gandhi said balasaheb thorat on yashomati thakur twee
-------------------------------------------------------------------
( संपादक - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.